निवृत्त पोलिस अधिकारी भास्कर साळवी यांचे निधन

By Admin | Updated: July 3, 2016 20:10 IST2016-07-03T20:10:51+5:302016-07-03T20:10:51+5:30

निवृत्त ज्येष्ठ पोलिस अधिकारी भास्कर भाऊराव साळवी यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कसोप गावचे.

Bhaskar Salvi's retired police officer | निवृत्त पोलिस अधिकारी भास्कर साळवी यांचे निधन

निवृत्त पोलिस अधिकारी भास्कर साळवी यांचे निधन

ऑनलाइन लोकमत
मुंबई : निवृत्त ज्येष्ठ पोलिस अधिकारी भास्कर भाऊराव साळवी यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कसोप गावचे.
भास्कर साळवी यांची पोलिस खात्यातील सुरुवातीची कारकीर्द कोल्हापुरातच गेली. ते कोल्हापुरात पोलिस निरीक्षक असताना वॉलकॉट नावाच्या आंतरराष्ट्रीय तस्करास त्यांनी एका कॉन्स्टेबलसह गोव्यात जाऊन पकडले होते. हे प्रकरण त्यावेळी बहुचर्चित ठरले होते.त्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने दोनवेळा सन्मानित करण्यात आले होते. त्यांची पोलिस खात्यातील बहुतांश कारकीर्द राजकीय गुप्तवार्ता विभागात गेली. त्यांच्या माहितीची व कामगिरीची केंद्रीय पातळीवर दखल घेतली गेली होती. केंद्रीय गुप्तवार्ता विभागात सहायक आयुक्त या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत असतात. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे त्यांचे जावई होत.

Web Title: Bhaskar Salvi's retired police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.