भास्कर जाधव यांची गडकरींशी चर्चा

By Admin | Updated: December 22, 2014 03:18 IST2014-12-22T03:18:24+5:302014-12-22T03:18:24+5:30

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तासभर चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत.

Bhaskar Jadhav discusses with Gadkari | भास्कर जाधव यांची गडकरींशी चर्चा

भास्कर जाधव यांची गडकरींशी चर्चा

नागपूर : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तासभर चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत.
विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नावर १९ तारखेला जोरदार चर्चा झाली. त्यावेळी भास्कर जाधव यांनी जोरदार भाषण दिले होते. त्यांच्या भाषणातील एक उल्लेख आक्षेपार्ह असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो कामकाजातून काढण्याची केलेली मागणी अध्यक्षांनी मान्य केली होती. विशेष म्हणजे, त्या भाषणाच्या काहीच वेळ आधी जाधव हे गडकरींना त्यांच्या वाड्यावर भेटून आले होते.

Web Title: Bhaskar Jadhav discusses with Gadkari