शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"कोंबडीवाले, बेडूक...'; थेट कुडाळातून भास्कर जाधवांचा राणेंवर हल्लाबोल, केले गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:10 IST

Bhaskar Jadhav Vs Narayan Rane:आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

सिंधुदुर्ग - शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ आज कुडाळमध्ये एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. राणेंना गेल्या आठ वर्षांत कुणी सभेसाठी बोलावलेलं नाही. नेते देशाचे आणि गल्लीतलं कुत्रही विचारत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

भास्कर जाधव म्हणाले की, सिंधुदुर्गातील कोंबडीवाले, बेडूक यांनी रे रोडला एक प्रोजेक्ट उभा केला. या प्रोजेक्टमध्ये ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू करावी म्हणून याच भाजपामधील किरीट सोमय्यांची मागणी करण्यात आली होती. आज मंत्रिमंडळात बसलेले ५०-५५ टक्के लोक, आमदार यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केले होते. तेच लोक भाजपामध्ये गेल्यावर अगदी साफ स्वच्छ होतात. निरमा पावडरचा कारखानाच भाजपाच्या घरात सुरू झाला आहे, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

या कोंबडीवाल्यांनी साडे अठरा वर्षांपूर्वी यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतच नाही. मात्र नारायण राणे हे गेली १८ वर्षे एकच वाक्य बोलताहेत की मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद गेलं आणि शिवसेना संपली, बरं मीसुद्धा शिवसेना सोडली होती. पण टीका करण्याची एक मर्यादा असते, असे भास्कर जाधव म्हणाले.

या राणेंना गेल्या आठ वर्षांत कुणी सभेसाठी बोलावलेलं नाही. नेते देशाचे आणि गल्लीतलं कुत्रही विचारत नाही. नुसती उद्धव ठाकरेंची सभा झाली की मीडियासमोर येऊन बोलतात. मी ३९ वर्षे शिवसेनेत काम केलं. मग ३९ वर्षे काय दाढ्या करत होतात काय. आज बाळासाहेब असते तर त्यांनी राणेंना विचारले असते की, त्यावेळी अंधेरी-गोरेगावला म्हशीचे तबेले होते. शिवसेनेने काहीच केलं नाही, मग मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेल्या तुम्ही काय म्हशी भादरत होतात का? अशी बोचरी टीका भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर केली.

यावेळी जाधव यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या प्रादेशिक पक्षांबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले की, आज स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहे. या ७५ वर्षात कुठल्याही राज्यकर्त्याने विरोधी पक्षाचा छळवाद मांडला नव्हता. तो भाजपाने मांडलाय. भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की, छोटे पक्ष शिल्लकच ठेवायचे नाही. राहील तो भाजपाच. या देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला जमीन दाखवू, असे म्हणतात, असा आरोप त्यांनी केला.    

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवNarayan Raneनारायण राणेShiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक