भास्कर जाधव कॅबिनेट मंत्री

By Admin | Updated: June 27, 2014 00:58 IST2014-06-27T00:58:53+5:302014-06-27T00:58:53+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना गुरुवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

Bhaskar Jadhav Cabinet Minister | भास्कर जाधव कॅबिनेट मंत्री

भास्कर जाधव कॅबिनेट मंत्री

>मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना गुरुवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राजभवनवर झालेल्या साध्या समारंभात राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. 
या वेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, अनिल देशमुख हे मंत्री उपस्थित होते. 
जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची बुधवारी जाधव यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड  झाली होती. तटकरे यांनी सायंकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जाधव यांची मंत्रिपदी वर्णी लागली. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवामुळे आपले अध्यक्षपद गेलेले नाही. तसे असते तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मला कॅबिनेट मंत्रिपद दिले नसते, 
असे जाधव यांनी  पत्रकारांना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
 

Web Title: Bhaskar Jadhav Cabinet Minister