शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंडिता माणिक भिडे यांना भारतरत्न पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 16:56 IST

राज्य शासनातर्फे भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी जेष्ठ गायिका माणिक भिडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

मुंबई, दि. २६ - राज्य शासनातर्फे भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी जेष्ठ गायिका माणिक भिडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु.५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पं.केशव गिंडे, पं.नाथराव नेरळकर, श्रीमती कमलताई भोंडे या मान्यवरांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांची शिफारस केली होती. यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आलेला आहे.पंडिता माणिक गोविंद भिडे. (जयपुर - अत्रोली घराणे) यांचा १९३५ साली कोल्हापूर येथे जन्म झाला. बालवयापासून संगीताची आवड असलेल्या माणिकताईंना आई-वडीलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले. जयपूर अत्रोली घराण्याचे आदयपुरुष उस्ताद अल्लादियाँ खाँ  यांचे पुत्र उस्ताद मजी खाँ व भूर्जी खाँ साहेब यांची तालीम लाभलेले श्री. मधुकरराव सडोलीकर हे माणिकताईंना गुरु म्हणून लाभले.श्री गोविंद भिडे यांच्याशी विवाह होऊन माणिकताई मुंबईस वास्तव्यात आल्या. या काळात सुमारे १५ वर्षे गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्यत्व माणिकताईंनी पत्करुन गानसाधनेतला कळस गाठला. माणिकताई आकाशवाणीच्या मान्यता प्राप्त कलाकार असुन देश व विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या गान्यांच्या सीडीज बाजारात उपलब्ध आहेत.सादरीकरणासोबत सक्षम गुरू हे त्यांचे मोठे योगदान संगीत क्षेत्राला लाभले आहे. संगीताची परंपरा जोपासणे हे कर्तव्य माणून माणिकताईंनी अनेक शिष्य घडविले त्यातील सौ. अश्विनी भिडे देशपांडे या त्यांच्या कन्या.   त्याचबरोबर माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतीका वर्दे या व अनेक शिष्यांना घडविले.

टॅग्स :musicसंगीतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारVinod Tawdeविनोद तावडे