‘भारतमाता की जय’ ही भारतीयत्वाची पावती - अनुपम खेर
By Admin | Updated: April 9, 2016 09:36 IST2016-04-09T01:55:51+5:302016-04-09T09:36:41+5:30
‘भारतमाता की जय’ म्हणणे ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे आणि तीच भारतीय असल्याची पावती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शुक्रवारी केले.

‘भारतमाता की जय’ ही भारतीयत्वाची पावती - अनुपम खेर
पुणे : ‘भारतमाता की जय’ म्हणणे ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे आणि तीच भारतीय असल्याची पावती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शुक्रवारी केले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन पुणेच्या वतीने (जितो ) अनुपम खेर यांच्या हस्ते पुणेज प्राइड पुरस्कारांचे वितरण झाले. उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांना पुणे प्राइड पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक कार्याबद्दल शांतिलाल मुथा, डॉ. गुणवंत ओसवाल यांचा, शैक्षणिक कार्याबद्दल वालचंद संचेती यांचा, तर युवा उद्योजक म्हणून डॉ. अश्विन पौडवाल यांचा गौरव करण्यात आला. या वेळी खासदार दिलीप गांधी, विजय भंडारे, राकेश सांकला, देवीचंद जैन, विजयकांत कोठारी, एस. के. जैन, अचल जैन, तेजराज उणेचा, राकेश मेहता, नरेंद्र भंडारी, अजित सेठिया उपस्थित होते.
अनुपम खेर म्हणाले, ‘‘काही लोकांनी देशाला बदनाम करण्याची जबाबदारीच घेतली आहे. ते अगदी थोडे आहेत; मात्र माझा विश्वास १२० कोटी भारतवासीयांवर आहे. जोपर्यंत नि:स्वार्थ भावनेने काम करणारे लोक आहे, तोपर्यंत देशाची मान गर्वाने वर राहील. चॅनलवरच्या डिबेटमध्ये दाखविले जाते, ते भारताचे वास्तविक चित्र नाही. मी ४५० चित्रपटांमध्ये काम करून, मला जेवढा आदर-सन्मान मिळाला नाही, तितका मागच्या ६ महिन्यांतील भाषणांमुळे मिळाला आहे.’’