भार्इंदरचा नितिन म्हात्रे सलग तिस-यांदा ठरला 'भारत श्री'

By Admin | Updated: March 5, 2017 18:43 IST2017-03-05T18:43:18+5:302017-03-05T18:43:18+5:30

भार्इंदर येथील मोर्वा गावात राहणारा नितिन म्हात्रे हा हरियाणातील गुडगाव येथे शनिवारी पार पडलेल्या भारतीय युवा मंत्रालय मान्यताप्राप्त

Bharatinder's Nitin Mhatre for third consecutive year 'Bharat Shree' | भार्इंदरचा नितिन म्हात्रे सलग तिस-यांदा ठरला 'भारत श्री'

भार्इंदरचा नितिन म्हात्रे सलग तिस-यांदा ठरला 'भारत श्री'

राजू काळे / ऑनलाइन लोकमत 
भार्इंदर, दि. 5 - भार्इंदर येथील मोर्वा गावात राहणारा नितिन म्हात्रे हा हरियाणातील गुडगाव येथे शनिवारी पार पडलेल्या भारतीय युवा मंत्रालय मान्यताप्राप्त इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन आयोजित १० वी भारत श्री २०१७ या शरीसौष्ठव स्पर्धेतील ५५ किलो गटात 'भारत श्री' चा मानकरी ठरला. हा खिताब सलग तीन वर्षे मिळविणारा नितिन हा देशातील पहिला शरीसौष्ठवपटू ठरल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या अनेक स्पर्धांत अव्वल ठरलेला नितिन भार्इंदरमध्येच स्वत:ची सुसज्ज जीम चालवितो. त्यातून त्याने स्थानिक व राज्यस्तरावरील अनेक शरीसौष्ठव घडविले आहेत. वडीलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून त्याने स्वत:ची शरीरयष्टीसुद्धा उत्तम राखली आहे. त्याला पिळदार शरीराचे सुरुवातीपासूनच आकर्षण राहिल्याने त्याने त्यात स्वत:ला चांगले घडविले आहे. सुरुवातीला त्याने मीरारोड येथे एका मित्राच्या सहकार्याने जीम सुरु केली होती. त्यात त्याने जीम ट्रेनर म्हणून भागीदारी स्वीकारली. शिवाय घरातील आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी रोजंदारीवर छोटा व्यवसाय सुरु केला.

या दोन्ही आर्थिक आधारात त्याचा नित्यनियमाने व्यायाम सुरु राहिला. स्थानिक व राज्य स्तरावरील अनेक स्पर्धांत त्याने यश संपादन केल्यानंतर तो थेट जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी झाला. २७ ते २९ डिसेंबर २०१५ दरम्यान वर्ल्ड बॉडीबिल्डींग अ‍ॅन्ड फिजिक्स स्पोर्टस् फेडरेशन आयोजित थायलंड देशातील बँकॉक येथे ७ व्या आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डींग चॅम्पियनशीप २०१५ शरीसौष्ठव स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. त्यातील ५५ किलो वजनी गटात त्याने चमकदार कामगिरी करीत सुवर्ण पदक पटकावुन शहरासह देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तो दररोज किमान ५ ते ७ तास सतत व्यायाम करुन आपल्या शरीरयष्टीला रोज १८ ते २० अंडी, १ ते दिड किलो चिकन व फळे अशी खर्चीक खुराक पुरवितो. त्याला यासाठी कोणतीही देणगी अथवा निधी ममिळत नसला तरी तो स्वत:च्या जीममधुन स्पर्धेचा व आहाराचा खर्च भागवित आहे.

हा खर्च सध्याच्या महागाईत अपुरा पडत असला तरी त्याने आपली जिद्द कायम ठेवली आहे. २०१५ ते २०१७ दरम्यान पार पडलेल्या महाराष्ट्र स्पर्धेत त्याने सलग तिसय््राांदा महाराष्ट्र श्री चा किताब पटकाविला. तसेच २०१५ मध्ये त्याने गुजरातच्या गांधीधाम येथील शरीसौष्ठव स्पर्धेत प्रथम भारत श्री चा किताब पटकावुन २०१६ मध्ये सुध्दा रायगड जिल्ह्यातील रोहा येथे पार पडलेल्या स्पर्धेत सलग दुसय््राांदा भारत श्री चा किताब मिळविला. यंदाची भारत श्री स्पर्धा गुरगाव येथे पार पडली. त्यात देशातील विविध राज्यांतुन सुमारे ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातीलच ५५ किलो वजनी गटात विविध राज्यांतुन एकुण ४३ स्पर्धक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातुन नितिनसह मुंबईतील मानखुर्दचा संदेश सकपाळ हे दोनच स्पर्धक सहभागी झाले होते. शनिवारी पार पडलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यात नितिन भारत श्री ठरला तर संदेश ५ व्या क्रमांकावर यशस्वी ठरला. नितिनला सलग तिसय््राा वर्षी भारत श्री किताब मिळाल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title: Bharatinder's Nitin Mhatre for third consecutive year 'Bharat Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.