‘पुरोहित यांची भावनाच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये’

By Admin | Updated: June 28, 2015 02:05 IST2015-06-28T02:05:43+5:302015-06-28T02:05:43+5:30

देशात स्थिर आणि मोठे बहुमत असणारे सरकार आहे, त्यामुळे तेथे काही होईल असे चित्र नाही. मात्र, भाजपामध्ये राज पुरोहित यांच्या मनात जी खदखद आहे

'Bharata's feelings for BJP workers' | ‘पुरोहित यांची भावनाच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये’

‘पुरोहित यांची भावनाच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये’

औरंगाबाद : देशात स्थिर आणि मोठे बहुमत असणारे सरकार आहे, त्यामुळे तेथे काही होईल असे चित्र नाही. मात्र, भाजपामध्ये राज पुरोहित यांच्या मनात जी खदखद आहे, ती राज्य सरकारसाठी चिंताजनक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी शनिवारी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ललित मोदी यांना प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वधेरा भेटल्याचे ‘टिष्ट्वट’ मोदींनी केले आहे, यावर पवार म्हणाले की, कोणाला भेटणे हा काही गुन्हा ठरू शकत नाही. मीदेखील मोदींना भेटलो होतो. मात्र, त्यावेळी मी त्यांना भारतात परत या, असेच सांगितले. त्यामुळे कोणी भेटल्यामुळे गंभीर गुन्हा घडला आहे, असे मानण्याचे कारण नाही. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांविषयी खा. पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देत ‘मी लहान सहान व्यक्तींबद्दल प्रतिक्रिया देत नाही, असे उपरोधिक विधान
केले. (प्रतिनिधी)

फडणवीसांना कुणी
सल्ला देऊ शकतो का?
आपण नरेंद्र मोदी यांना सल्ले देता; त्यामुळे आता भ्रष्टाचार आणि अंतर्गत वादामुळे संकटात सापडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण काय सल्ला द्याल, या प्रश्नावर खा. शरद पवार यांनी एकदम ‘फडणवीसांना कोणी सल्ला देऊ शकतो काय, तुम्हाला इतिहास माहीत नाही काय, असे सांगताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.

Web Title: 'Bharata's feelings for BJP workers'