भंते सुरेई ससाई यांची प्रकृती अत्यवस्थ
By Admin | Updated: August 1, 2014 01:17 IST2014-08-01T01:17:00+5:302014-08-01T01:17:00+5:30
बौद्धांचे धम्मगुरू भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची प्रकृती गुरुवारी आणखी खालावली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर

भंते सुरेई ससाई यांची प्रकृती अत्यवस्थ
नागपूर : बौद्धांचे धम्मगुरू भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची प्रकृती गुरुवारी आणखी खालावली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भंते ससाई यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना १८ जुलै रोजी पंचशील चौकातील केअर हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी सकाळपासून त्यांना श्वास घेण्यास अडचण होऊ लागली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर (कृत्रिम श्वासोच्छवास) लावण्यात आले. डॉ. वैभव बानाईत यांच्या नेतृत्वातील चमू भंतेजींवर उपचार करीत आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून स्थिर असल्याचे डॉ. बानाईत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भंतेजींची प्रकृती खालावल्याचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी वाढली. दरम्यान, भंते सुरेई ससाई यांचे जपानमधील शिष्यगण व आप्तेष्टांकडूनसुद्धा भंतेजींच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली जात आहे. (प्रतिनिधी)