शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हायकमांडशी बोलूनच भंडारा-गोंदियात लढायचे की नाही ठरवू- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 16:39 IST

भाजपा सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असेही पटेल यांनी म्हटले होते.

मुंबई:  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदियातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरले, अशी घोषणा प्रफुल्ल पटेल आज गोंदियातील पत्रकार परिषदेत केली. भाजपा सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असेही पटेल यांनी सांगितले. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसने अजूनपर्यंत या जागेवरील दावा सोडला नसल्याचे सांगितले. मी पाच वाजता राहुल गांधींची भेट घेणार आहे. त्यावेळी हायकमांड जो आदेश देतील, तो मला मान्य असेल. तसेच प्रथम या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाल्याचे जाहीर होऊ दे. त्यानंतर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस का राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, हे मिळून ठरवू असे पटोले यांनी म्हटले. आम्हाला प्रफुल्ल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी मतभेद निर्माण करायचे नाहीत. निवडणूक कुणीही लढवली तरी भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र लढू, अशी सामंजस्याची भूमिका यावेळी नाना पटोले यांनी मांडली.यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीने नुकतीच विधानपरिषद निवडणुकांसाठी युती केली होती. दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला मान्य केला होता. त्यानुसार अमरावती, परभणी-हिंगोली व चंद्रपूर या जागांवर काँग्रेस लढेल. तर लातूर,  कोकण आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNCPराष्ट्रवादी काँग्रेस