‘श्रीं’च्या प्रकटदिनी भक्तिसागर उसळला
By Admin | Updated: March 2, 2016 02:31 IST2016-03-02T02:31:32+5:302016-03-02T02:31:32+5:30
संतनगरी दुमदुमली; राज्यभरातून साडेतीन लाख भक्तांची उपस्थिती.

‘श्रीं’च्या प्रकटदिनी भक्तिसागर उसळला
गजानन कलोरे /शेगाव
टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकर्यांच्या मुखातून निघणार्या गजानानाचा नामघोषाने अवघी संतनगरी मंगळवारी दुमदुमून गेली. माघ वद्य सप्तमी या तिथीनुसार १ मार्च रोजी ह्यश्रींह्णच्या प्रकटदिनाचा १३८ वा सोहळा राजवैभवी थाटात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील १ हजार ६५६ भजनी दिंड्यांसह तब्बल साडेतीन लाख भक्तांची उपस्थिती होती, हे विशेष.
सकाळी १0 वाजता महारुद्र स्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व विश्वस्तांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी ह्यश्रींचे प्रागट्यह्णनिमित्त हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे कीर्तन झाले. दुपारी ठीक १२ वाजता मंदिर परिसरात उपस्थित लाखो भाविकांनी मंदिराच्या दिशेने गुलाबपुष्पाची उधळण करून ह्यश्रींह्णप्रति आपली ङ्म्रद्धा अर्पण करून प्रकट क्षण भक्तिभावाने साजरा केला. दुपारी मंदिर प्रांगणातून ह्यङ्म्रींह्णच्या पालखीची रथ, मेणा व गज, अश्वासह नगरपरिक्रमा काढण्यात आली.
श्री हरिहर शिव मंदिर, ह्यङ्म्रींह्णचे प्रकट स्थळ व श्री मारुती मंदिर या ठिकाणी विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ह्यङ्म्रींह्णच्या पालखीतील वारकर्यांना ज्ञानेश्वर लिप्ते, किशोरबाबू टांक यांच्यावतीने चहा देण्यात आला. फूलवाले गोमागे यांनी ह्यङ्म्रींह्णंच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली.
ह्यङ्म्रींह्णची पालखी, त्या मागे ह्यङ्म्रींह्णचे तैलचित्र असलेला मेणा व सुशोभित रथ होता. त्यापाठोपाठ श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांंंची भजनी दिंडी, श्री गजानन इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांंंची भजनी दिंडी होती. या परिक्रमेने अवघे शहर दुमदुमून गेले होते. भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवार, २ मार्चला सकाळी हभप जगन्नाथ म्हस्के यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होत आहे.