भंगेवाडीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: March 22, 2017 19:22 IST2017-03-22T19:22:04+5:302017-03-22T19:22:24+5:30
औसा तालुक्यातील भंगेवाडी येथील शेतकरी गणपती शेषेराव हासबे (४५) यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास

भंगेवाडीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 22 - औसा तालुक्यातील भंगेवाडी येथील शेतकरी गणपती शेषेराव हासबे (४५) यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
लातूर, दि. 22 - औसा तालुक्यातील भंगेवाडी येथील शेतकरी गणपती शेषेराव हासबे (४५) यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
भंगेवाडी येथील गणपती हासबे यांच्या नावे शेती नाही मात्र, त्यांच्या वडिल शेषेराव हासबे यांच्या नावावर ०.७१ आर एवढी शेती आहे. गणपती हासबे यांनी शेतात बुधवारी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही आत्महत्या कर्जबाजारीपणास कंटाळून केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी औसा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.