नवी मुंबईत भरदिवसा दरोडा, २०-२२ किलो सोने लुटले

By Admin | Updated: August 6, 2016 16:45 IST2016-08-06T16:16:12+5:302016-08-06T16:45:51+5:30

सीवूड्स येथील पॉप्युलर कंपनीत भरदिवसा दरोडा टाकून २०-२२ किलो सोने लुटण्यात आले,

Bhaddisha robbery in Navi Mumbai, robbed 20-22 kg of gold | नवी मुंबईत भरदिवसा दरोडा, २०-२२ किलो सोने लुटले

नवी मुंबईत भरदिवसा दरोडा, २०-२२ किलो सोने लुटले

>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. ६ - सीवूड्स येथील पॉप्युलर कंपनीत भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ६ ते ७ जणांनी सिवूड सेक्टर ४२ मधील पॅाप्युलर फायनांस कंपनीत घुसून पिस्तुल व तलवारीचा धाक दाखवत २० ते २२ किलो सोने लुटल्याचे वृत्त आहे. 
सीवूड रेल्वे स्टेशन समोर सेक्टर ४२ मधील भुखंड क्रमांक ४२ वर पॅाप्युलर फायनान्सचे कार्यालय असून दुपारी साडेतीन पावणेचारच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती कंपनीच्या कार्यालयात घुसल्या. त्यांनी 
कर्मचा-यांना पिस्तुलाचा धाक दाखवत तिजोरीतील सोने पळवले. 
या दरोड्याचे वृत्त मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दरोडेखोरांच्या शोधार्थ सर्वत्र नाकांबदी करण्यात आली आहे. तसेच श्वानपथक व ठसे तज्ञ तपासणी करत असून कंपनीतील कर्मचा-यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. 
 

Web Title: Bhaddisha robbery in Navi Mumbai, robbed 20-22 kg of gold