सावधान... झटपट ओळख घातकच!

By Admin | Updated: June 29, 2014 00:54 IST2014-06-29T00:54:12+5:302014-06-29T00:54:12+5:30

रस्त्यावर उभी असलेल्या तरुणीला त्याने लिफ्ट दिली. त्यांच्यात ओळख झाली. नंतर मैत्री झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर घेत त्यांनी संपर्क वाढवला. तिने त्याला फोन करून फिरण्यासाठी बोलवून घेतले.

Beware ... Instant Identity False! | सावधान... झटपट ओळख घातकच!

सावधान... झटपट ओळख घातकच!

मित्राचे कृत्य : आधी दारू पाजली, जेवू घातले, नंतर केला बलात्कार
नागपूर : रस्त्यावर उभी असलेल्या तरुणीला त्याने लिफ्ट दिली. त्यांच्यात ओळख झाली. नंतर मैत्री झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर घेत त्यांनी संपर्क वाढवला. तिने त्याला फोन करून फिरण्यासाठी बोलवून घेतले. फिरणे झाल्यानंतर, जेवायला जाऊ म्हणत त्याने तिला वर्धा मार्गावर नेले. ढाब्यावर जेवण करताना दोघेही मस्त दारू प्यायले. नंतर नशेत असलेल्या मैत्रिणीला त्याने मिहान प्रकल्पातील निर्जन ठिकाणी नेले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. ती तरुणी पोलीस ठाण्यात पोहचली. मित्राने आपल्यावर बलात्कार केला, अशी तिने तक्रार नोंदवली. एखाद्या सिनेमातील वाटावी अशी ही घटना सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ जून ते २४ जून या कालावधीत घडली.
तक्रारकर्ती तरुणी २१ वर्षांची असून, उच्चशिक्षित आहे. गेल्या आठवड्यात राकेश लखाटे (वय ३०, रा. शताब्दीनगर) याच्याकडून लिफ्ट घेतल्यानंतर पहिल्याच भेटीत या दोघांनी एकमेकांना ‘लाईक’ केले. मोबाईल नंबर दिले. नंतर त्यांच्यातील संपर्क वाढला. २३ जूनला मध्यरात्री त्यांच्यात संभाषण झाले. दुसऱ्या दिवशी हे दोघे फिरायला निघाले. रात्री त्याने तिला वर्धा रोडवर जेवण करण्यासाठी नेले.
तेथे जेवणासोबतच हे दोघे दारूही प्यायले. मध्यरात्री ते मिहानमधील निर्जन ठिकाणी गेले. तरुणीच्या तक्रारीनुसार, ती दारूच्या नशेत असल्याची संधी साधून राकेशने तिच्यावर बलात्कार केला. तीन दिवस शांत राहिल्यानंतर तिने सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय निशा बनसोड यांनी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी राकेशचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
अनुत्तरित प्रश्न
या प्रकरणातील तक्रारकर्ती चांगली शिक्षित असताना ती रात्रीच्या वेळी त्या तरुणासोबत गेलीच कशी, गेली तर गेली दारू कशाला प्यायली, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. राकेशच्या अटकेनंतरच या प्रकरणातील दुसरी बाजू पुढे येईल, असे पोलीस सांगतात.

Web Title: Beware ... Instant Identity False!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.