शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

खबरदार  ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसाल तर! नोव्हेंबरपासून दुप्पट टोल वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 06:10 IST

Fastag Charges: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ८ याप्रमाणे १६ लेन आहेत. सर्व लेनमधून ‘फास्ट टॅग’सह अन्य पर्यायांद्वारे टोल वसुली होत होती.

राजानंद मोरेलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यांवर राखीव असलेल्या प्रत्येकी दोन ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसखोरी करणे वाहनचालकांना महागात पडत आहे. ‘फास्ट टॅग’ नसल्यास वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसुली १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या आठवडाभरात सुमारे ३ हजार वाहनांकडून ७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

देशात मागील सहा महिन्यांपासून ‘फास्ट टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला काही राष्ट्रीय महामार्गांवर टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्वावर ‘फास्ट टॅग’ वापर सुरू झाला. आता १ जानेवारीपासून सर्व टोलनाक्यांवर ‘फास्ट टॅग’द्वारेच टोल वसुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पण, प्रत्यक्षात सहा वर्षानंतर अनेक वाहनांवर ‘फास्ट टॅग’ नसल्याचे चित्र आहे. 

मागील वर्षी राष्ट्रीय महामार्गांवर ‘फास्ट टॅग’ टोल वसुलीसाठी एक ते दोन लेन वगळता सर्व लेन राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण अनेक वाहनांना ‘फास्ट टॅग’ नसल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. त्यामुळे हे बंधन शिथील करण्यात आले. आता नवीन वर्षापासून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ८ याप्रमाणे १६ लेन आहेत. सर्व लेनमधून ‘फास्ट टॅग’सह अन्य पर्यायांद्वारे टोल वसुली होत होती. पण १ नोव्हेंबरपासून प्रत्येकी दोन लेन केवळ ‘फास्ट टॅग’साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत सहा लेनमधून सर्व वाहनांना जाता येते. राखीव असलेल्या लेनमधून फास्ट टॅग नसलेली वाहने घुसल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल घेतला जात आहे.   महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबत पत्र दिले आहे, अशी  माहिती ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’चे प्रवक्ते विवेक देवस्थळी यांनी दिली.

देशात ‘फास्ट टॅग’ला वाढता प्रतिसादराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार, देशातील ‘फास्ट टॅग’ असलेल्या वाहनांचा आकडा २ कोटींपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दररोजची एकूण टोलवसुली ९२ कोटींवर पोहचली आहे. मागील वर्षी हा आकडा सुमारे ७० कोटी एवढा होता. एकूण टोलवसुलीत ७५ टक्के वसुली ‘फास्ट टॅग’द्वारे होत आहे.१० हजार वाहनांना ‘फास्ट टॅग’n पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘फास्ट टॅग’ला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर दररोज सुमारे ५० ते ५५ हजार वाहने ये-जा करतात. n त्यापैकी सुमारे ३५ हजार कार आणि अन्य हलकी वाहने आहेत. त्यापैकी केवळ १० हजार वाहनांनाच ‘फास्ट टॅग’ असल्याचे विवेक देवस्थळी यांनी सांगितले. n १ जानेवारीपासून सर्व लेन ‘फास्ट टॅग’साठी राखीव झाल्यास, दुप्पट टोल वसुली करण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे