‘बिग बी’च्या हाती झाडू

By Admin | Updated: October 31, 2014 01:58 IST2014-10-31T01:58:20+5:302014-10-31T01:58:20+5:30

‘स्वच्छ भारत’ अभियानात आता बिग बी अमिताभ बच्चन हेदेखील हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले असून, त्यांनी प्रत्येकाला या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Beware in Big Bee's | ‘बिग बी’च्या हाती झाडू

‘बिग बी’च्या हाती झाडू

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात आता बिग बी अमिताभ बच्चन हेदेखील हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले असून, त्यांनी प्रत्येकाला या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’चा संकल्प केला. शिवाय मोदी स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्याने विविध क्षेत्रंतील दिग्गजांनी या अभियानाला पाठिंबा दर्शविला. बुधवारी सायंकाळी चक्क अमिताभ बच्चनदेखील या अभियानात सामील झाले. जुहू परिसरात दाखल झालेल्या अमिताभ यांनी हातात झाडू घेतला आणि लगतचा परिसर स्वच्छ केला. महत्त्वाचे म्हणजे एवढे करूनच ते थांबले नाहीत तर भारतीयांना आवाहन करण्यासाठी त्यांनी आपण झाडू मारतानाचे तसेच कचरा उचलून कचरापेटीत टाकतानाचे आपले फोटो ट्विटरवर अपलोड केले. शिवाय ‘मी स्वच्छ भारत अभियानात उतरलोय, माङयाप्रमाणो देशातील प्रत्येकाने या अभियानासाठी हातभार लावण्याची आवश्यकता आहे,’ असे आवाहनदेखील ट्विटद्वारे केले.
दरम्यान, सचिन तेंडुलकर, हृतिक रोशन, सलमान खान, अनिल अंबानी, शशी थरूर या बडय़ा मंडळींनीदेखील अभियानात आपला सहभाग नोंदविला आहे. आता बिग बी यांनीदेखील या अभियानात सहभाग घेतल्याने आणखी एक मोठे नाव अभियानाला जोडले गेले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Beware in Big Bee's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.