शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2026: संक्रांत कोणावर अन् वाण कोणाला मिळणार?, पैजा लागल्या, कुंडल्या बघून निकालावर अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:41 IST

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रंगल्या पैजा

सांगली : ऐन संक्रांतीच्या सणालाच निवडणुकांचा माहोल गरम झाला आहे. अनेक प्रभागात चुरशीच्या लढती रंगल्याने कोण जिंकणार अन् कोण हरणार याचा अंदाज लावणे कठीण होत आहे. तरीही संक्रांत कोणावर येणार अन् विजयाचे वाण कोणाच्या हाती पडणार यावरून सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात पैजा रंगल्या आहेत. पैजांमध्ये पैसे, वाहने, मोबाइल डावावर लागले आहेत.सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या एकूण २० प्रभागात ७८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यंदा ३८१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदा पक्षांची संख्याही खूप असल्याने लढतींचे चित्र रंगतदार बनले आहे. पहिल्या टप्प्यात कोणताही अंदाज लागणे शक्य नव्हते. आता प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरु असल्याने राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्येही निकालावरून पैजा लावल्या जात आहे.

वाचा: सांगली महापालिका निवडणुकीत १५ प्रभागांत बिग फाईट; लक्षवेधी लढतीतील प्रभाग, उमेदवार.. जाणून घ्यानिवडणुका म्हटलं की पैजा आल्याच. पैजा म्हटलं की हार-जीत आलीच. निवडणुकीत जिंकणाऱ्या उमेदवाराबाबत अंदाज व्यक्त करीत पैजांचे विडे उचलले जात आहेत. नगरपालिका निवडणुकीतही छुप्या व जाहीर पैजा लावण्यात आल्या होत्या. निकालानंतर त्याची पूर्तता काही ठिकाणी करण्यात आली. आता महापालिका निवडणुकीतही निकालाची उत्सुकता लागली असताना अंदाजांची जागा पैजांनी घ्यायला सुरुवात झाली आहे.

वाचा: सांगली महापालिका निवडणुकीत 'रिक्षावाल्यां'चे चिन्हही 'ऑटो रिक्षा'च, अनोख्या योगायोगाची रंगतदार चर्चा

कशाकशावर पैजा लागल्या?

  • प्रभागात कोणत्या गटात कोण विजयी होणार यापासून कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर पैजा लागल्या आहेत.
  • सर्वाधिक पैजा या विजयी व पराभूत उमेदवार कोण असेल यावर लागल्या आहेत.
  • महापालिकेत सत्ता कोणाची येणार यावर लागलेल्या पैजांची संख्या कमी आहे.
  • रकमांच्या स्वरुपातील पैजांचे प्रमाण अधिक दिसून येते.

गतवेळी अंदाज चुकलेमागील निवडणुकीत भाजपला अनपेक्षित यश मिळाल्याने अनेकांचे अंदाज चुकले होते. यंदा अनेक पक्ष मैदानात उतरल्याने व सर्वांनी ताकद लावल्याने महापालिकेत सत्ता कोणाची येणार यावरील अंदाज फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत. त्यामुळे उमेदवारांवरच अधिक अंदाज वर्तविले जात आहेत.

कुंडल्या बघून अंदाजकाही उमेदवारांनी कुंडल्या दाखवून निकालाबाबत अंदाज घेतला असल्याने निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी त्या आधारावरही पैजा लावण्यास सुरुवात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election 2026: Bets Placed, Astrology Used for Predictions

Web Summary : With Sangli Municipal elections heating up, betting is rife on winners. People wager money, vehicles and phones. Astrologers are consulted for predictions adding another layer to the election frenzy.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Makar Sankrantiमकर संक्रांती