गर्लफ्रेंडसोबत केलेली मस्करी बेतली त्याच्याच जिवावर

By Admin | Updated: January 5, 2017 12:36 IST2017-01-05T12:16:43+5:302017-01-05T12:36:12+5:30

मस्करी मस्करीमध्ये स्वतःवर जिव गमावण्याची वेळ येईल, असे 21 वर्षांचा मॅनेजमेंटचा विद्यार्थी असलेल्या सन्मित राणेनं स्वप्नातही विचार केला नसेल.

Betlley wins her mockery with girlfriend | गर्लफ्रेंडसोबत केलेली मस्करी बेतली त्याच्याच जिवावर

गर्लफ्रेंडसोबत केलेली मस्करी बेतली त्याच्याच जिवावर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 5 - मस्करी मस्करीमध्ये स्वतःवर जिव गमावण्याची वेळ येईल, असे 21 वर्षांचा मॅनेजमेंटचा विद्यार्थी असलेल्या सन्मित राणेनं स्वप्नातही विचार केला नसेल. गलफ्रेंडसोबत मस्करी करत असताना तिच मस्करी सन्मितसाठी जिवघेणी ठरली. दुर्दैवी बाब म्हणजे गलफ्रेंडसमोरच सन्मितचा तडफडून जिव गेला. सन्मित राणे मस्करीच्या मूडमध्ये होता,  मस्करी-मस्करीत त्याने स्वतःच्या गळ्याभोवती फास लावला, यावेळी तोल जाऊन त्याच्या पायाखालील टेबल निसटला आणि गळ्याभोवती फास घट्ट आवळला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. मीरा रोड परिसरातील या धक्कादायक प्रकार खळबळ उडाली आहे.  
 
सन्मित आणि त्याची गलफ्रेंड, दोघं एकाच सोसायटीमध्ये राहणारे. दोघांच्या कुटुंबीयांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती. घटनेनंतर सन्मितच्या मैत्रिणीने पोलिसांनी दिलेल्या जबाबात असे सांगितले की, 'जर मी त्याला सोडले तर तो जिव देईल, असे सन्मित मस्करीत म्हणत होता. यानंतर तो बेडरुममध्ये गेला, टेबल उचलला, ओढणीचा फास बनवला आणि पंख्यावर टाकला, या मस्करीदरम्यान त्याचा तोल गेला आणि फास त्याच्या गळ्याभोवती खरोखरच आवळला गेला.'
या घटनेमुळे घाबरलेल्या सन्मितच्या मैत्रिणीने मित्राला बोलावले. दोन व्यक्तींनी मिळून सन्मितला खाली उतरवले. चाकूने फास कापला आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता,  डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन्मितच्या पालकांनी त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 

Web Title: Betlley wins her mockery with girlfriend