शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे पिछाडीवर; ९८.१ टक्के लोकांनी केले नापसंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 14:49 IST

Is Eknath Shinde Populer in Maharashtra? देशातली विविध राज्यांपैकी त्या त्या राज्यात कोणते मुख्यमंत्री सर्वाधिक पसंतीचे आहेत, याचीही आकडेवारी इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनमध्ये देण्यात आली होती.

आज जर लोकसभा निवडणूक झाली तर भाजप प्रणित एनडीएला किती आणि इंडिया आघाडी व विरोधकांना किती जागा मिळणार याचे दोन दिवसांपूर्वीच ओपिनिअन पोल आले होते. यातच देशातली विविध राज्यांपैकी त्या त्या राज्यात कोणते मुख्यमंत्री सर्वाधिक पसंतीचे आहेत, याचीही आकडेवारी इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनमध्ये देण्यात आली होती. यामध्ये ओडिशाचे सीएम नवीन पटनायक यांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का देणारी आकडेवारी आली आहे. 

नवीन पटनायक यांना 52.7 टक्के जनतेने पसंतीचे असल्याचे म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांना 46.9% टक्के जनतेने पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आसामचे हिमंत बिस्वा शर्मा 48.6 टक्के मते घेऊन आले आहेत. गुजरातचे सीएम 42.6 टक्के मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. 

अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम'यानंतर त्रिपुराचे मानिक साहा, गोव्याचे प्रमोद सावंत, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे एम के स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांचा नंबर लागत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिल्या दहातही नंबर आलेला नाहीय. 

हा देखील सर्व्हे वाचा...मोठा उलटफेर! आज लोकसभा निवडणूक झाली तर...; टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा महाराष्ट्रासह देशात सर्व्हे

हा नवा सर्व्हे वाचा... आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सीव्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+

महाराष्ट्रात शिवसेना काबीज करत भाजपासोबत सत्ता स्थापन केलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात खूप मागे पडले आहेत. शिंदे यांना महाराष्ट्रातून अवघी १.९ टक्के लोकांचीच मते पडली आहेत. शिंदे यांची राज्यात पसंती खूपच कमी झाली आहे, हे यावरून दिसून येत आहे. या यादीत शिंदे यांचा शेवटून तिसरा क्रमांक लागत आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री