युपीएससीच्या विद्यार्थांना प्रतिमहिना १० हजार रुपये निर्वाह भत्ता
By Admin | Updated: January 12, 2016 18:56 IST2016-01-12T18:56:03+5:302016-01-12T18:56:03+5:30
महाराष्ट्र सरकार युपीएससीच्या उतीर्ण विद्यार्थांना दरमाह १० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देणार आहे. ही राज्य सरकारची विषेश शिष्यवृत्ती योजना आहे.

युपीएससीच्या विद्यार्थांना प्रतिमहिना १० हजार रुपये निर्वाह भत्ता
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्र सरकार युपीएससीच्या उतीर्ण विद्यार्थांना दरमाह १० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देणार आहे. ही राज्य सरकारची विषेश शिष्यवृत्ती योजना आहे. यामुळे महाराष्ट्रातील IAS, IPS अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. आज राज्य मंत्रीमंडळ बैठकात या विषेश शिष्यवृत्ती योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे. युपीएससी ची तयारी करणा-या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
राज्यसरकारच्या या महत्वपुर्ण निर्णयामुळे भावी IAS, IPS अधिका-यांना मोठ्या दिलासा मिळाला आहे.
राज्यातील IAS आणि IPS परीक्षेच्या मुख्य परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थांचा पुढील वर्षीच्या मुख्य परीक्षेपर्यंतचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.