विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात

By Admin | Updated: May 29, 2017 19:15 IST2017-05-29T19:14:27+5:302017-05-29T19:15:17+5:30

कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्या गाडीचा सोमवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात ते सुखरुप असल्याचे समजते.

Belief in Nangre-Patil's car accident | विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात

विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 29 - कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्या गाडीचा सोमवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात ते सुखरुप असल्याचे समजते.  
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. यावेळी ते मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर आले. त्यावेळी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील विमानतळाकडे जात असताना उजळाईवाडीजवळ त्यांच्या सरकारी गाडीचा अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने जात असताना एका वळणावर त्यांच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्याकडेला असणा-या खड्यात जाऊन पडली. 
दरम्यान, या अपघातात विश्वास नांगरे- पाटील किरकोळ जखमी झाले असून  त्यांच्यासह तिघेजण सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: Belief in Nangre-Patil's car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.