बेळगावच्या महापौरपदी मराठी भाषिक, संज्योत बांदेकर महापौरपदी
By Admin | Updated: March 1, 2017 20:18 IST2017-03-01T20:16:00+5:302017-03-01T20:18:28+5:30
बेळगाव महापौरपदी मराठी भाषिक संज्योत बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे, तर नागेश मंडोळकर यांची उपमहापौरपदाची निवड झाली आहे.

बेळगावच्या महापौरपदी मराठी भाषिक, संज्योत बांदेकर महापौरपदी
>ऑनलाइन लोकमत
बेळगाव, दि. 01 - बेळगाव महापौरपदी मराठी भाषिक संज्योत बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे, तर नागेश मंडोळकर यांची उपमहापौरपदाची निवड झाली आहे.
येथील मराठी भाषिकात २२ नगरसेवकांचा एक आणि १० नगरसेवकांचा एक असा झाला होता. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काय होणार? याकडेच सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, काल रात्री दोन्ही गट एकत्र आल्याने बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा मराठीचाच झेंडा फडकला आहे. आजच्या निवडणुकीत संज्योत बांदेकर यांनी सर्वाधिक ३२ मते मिळवून महापौरपदाच्या शर्यतीत बाजी मारली. त्यांनी कानडी - उर्दू गटाच्या जयश्री माळगी यांचा पराभव केला. माळगींना १७, तर पुष्पा पर्वतराव यांना १० मते मिळाली.
दरम्यान, मराठी भाषिक गटातून महापौर पदासाठी सुरुवातीला संज्योत बांदेकर आणि मधुश्री पुजारी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अखेरीस संज्योत बांदेकर यांचे नाव पुढे करण्यात आले. बेळगाव महापालिकेत यंदा महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव होते. तर उपमहापौर पद खुल्या प्रवर्गासाठी होते.