महाप्रसाद बनवताना झाला वाद, युवतीने गमावला जीव
By Admin | Updated: September 15, 2016 22:22 IST2016-09-15T22:16:32+5:302016-09-15T22:22:52+5:30
गणपतीचा महाप्रसाद बनवताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात धक्का लागल्याने एका युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना

महाप्रसाद बनवताना झाला वाद, युवतीने गमावला जीव
>ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि.15- गणपतीचा महाप्रसाद बनवताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात धक्का लागल्याने एका युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सदर छावनी येथे घडली. मनीषा किशोर मसराम (२७) असे मृत युवतीचे नाव आहे.
छावनी येथील हनुमान मंदिराच्या बाल गोपाल गणेशोत्सव मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त बुधवारी रात्री महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. महाप्रसाद करण्याच्या जागेवरून मनीषाचा भाऊ लोकेश (३०) याचे वस्तीतील दर्शन नावाच्या युवकासोबत भांडण झाले. दोघेही एकमेकांशी वाद घालू लागले. लोकेशची बहिण मनीषा भांडण सोडविण्यासाठी गेली. दरम्यान दर्शनचा मनीषाला धक्का लागल्याने ती रस्त्यावर जाऊन पडली आणि बेशुद्ध झाली. कुटुंबियांनी तिला तातडीने मेयो रुग्णालयात नेले. मात्र, तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करीत तपास सुरु केला आहे.