राज्यातील सर्व निवासी डॉक्टर संप घेणार मागे

By Admin | Updated: March 23, 2017 13:59 IST2017-03-23T12:29:53+5:302017-03-23T13:59:25+5:30

संपावर जाण्याआधी तुमची शपथ आठवा आणि तात्काळ कामावर रुजू व्हा

Behind all the resident doctors of the state will spend | राज्यातील सर्व निवासी डॉक्टर संप घेणार मागे

राज्यातील सर्व निवासी डॉक्टर संप घेणार मागे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - उच्च न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर आता राज्यभरातील सर्व डॉक्टर संप मागे घेणार आहेत. संपावर जाण्याआधी तुमची शपथ आठवा आणि तात्काळ कामावर रुजू व्हा, असे निर्देशच मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यानंतर संपकरी डॉक्टरांनीही कोर्टाला संप मागे घेण्याचं आश्वसान दिलं आहे. या प्रकरणात 15 दिवसांनी पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही डॉक्टरांच्या संपावर विधानसभेत निवेदन सादर केलं आहे. त्यात त्यांनी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. धुळ्यातील डॉक्टरांवरील हल्ला निषेधार्ह आहे. सरकार डॉक्टरांच्या पाठीशी आहे. डॉक्टरांवर हल्ले होणार नाहीत, याची काळजी घेऊ. रुग्णांना सेवा नाकारणं, संपावर जाणं योग्य नाही. मार्ड आणि इतर डॉक्टर संघटनांना विनंती संप मागे घ्यावा ,कामावर रुजू व्हावे. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, धुळे, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद येथे रुग्णांच्या नातेवाइकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी संपकरी डॉक्टरांवर ताशेरे ओढले असतानाच आज त्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. तर बुधवारी राज्य शासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. अनेक डॉक्टरांना निलंबित केले तर, अनेकांना नोटिसा बजावल्या. तसेच रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापला जाईल, असा इशाराही डॉक्टरांना राज्य सरकारकडून देण्यात आला होता.

 

 

जे. जे. हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांनी अधिष्ठात डॉ. तात्याराव लहाने यांच्या केबिनबाहेर ठिय्या आंदोलन केले. यानंतर लहानेंसोबत निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे यावेळी केवळ तोंडी आश्वासन देण्यात आल्याने डॉक्टरांमध्ये नाराजी वातावरण

Web Title: Behind all the resident doctors of the state will spend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.