शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Onion Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीला कांद्याचे दर आले निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 03:47 IST

Onion Price : एपीएमसीत ३५ ते ५० रुपये दर; किरकोळ मार्केटमध्ये दर ६०

नवी मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीला कांदा दरामध्ये घसरण सुरू झाली आहे. दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा ३५ ते ५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.२०१९ साली देशभर कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन दरवाढीने नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. सोलापूरमधील होलसेल मार्केटमध्येही २०० रुपये प्रतिकिलो दर प्राप्त झाला होता. मुंबई बाजार समितीमध्येही बाजारभाव १३० रुपयांवर गेले होते. नवीन वर्षामध्ये कांद्याचे दर नियंत्रणामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी बाजार समितीमध्ये ७२५ टन कांद्याची आवक झाली असून, प्रतिकिलो ३५ ते ५० रुपये दराने विक्री झाली आहे. किरकोळ मार्केटमध्येही दर घसरू लागले असून, ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. बाजारभाव जवळपास निम्यावर आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.मुंबईमध्ये नाशिक, पुणे परिसरामधून कांद्याची आवक होत आहे. पांढऱ्या कांद्याचीही आवक सुरू असून, तो ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. इजिप्त व तुर्कीच्या कांद्याला ३० ते ३५ रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.मुंबई बाजार समितीतील बाजारभाव पुढीलप्रमाणे-दिनांक दर७ डिसेंबर ६० ते १३०२० डिसेंबर ६० ते १००२७ डिसेंबर ६० ते ८०३ जानेवारी ३५ ते ५०

टॅग्स :onionकांदा