नववर्षाच्या प्रारंभीच अज्ञातांकडून चार गाड्यांची जोळपोळ

By Admin | Updated: January 1, 2017 16:58 IST2017-01-01T16:58:03+5:302017-01-01T16:58:03+5:30

नववर्षाच्या स्वागतामध्ये एकीकडे सर्व जण मग्न असतानाच दुसरीकडे मात्र अज्ञातांनी चार मोटारसायकलींची जाळपोळ केली.

At the beginning of the new year, four trains from the accustomed to the splurge | नववर्षाच्या प्रारंभीच अज्ञातांकडून चार गाड्यांची जोळपोळ

नववर्षाच्या प्रारंभीच अज्ञातांकडून चार गाड्यांची जोळपोळ

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 1 - नववर्षाच्या स्वागतामध्ये एकीकडे सर्व जण मग्न असतानाच दुसरीकडे मात्र अज्ञातांनी चार मोटारसायकलींची जाळपोळ केली. येथील व्यंकटपुरा पेठेत मध्यरात्री हा प्रकार घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यंकटपुरा पेठेमध्ये लखन गोसावी हे राहतात. शनिवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या घरासमोर लावलेल्या चार मोटारसायकली अज्ञाताने पेट्रोल ओतून जाळल्या. हा प्रकार पहाटे तीनच्या सुमारास काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस आल्यानंतर व्यंकटपुरा पेठेमध्ये इतरत्र त्यांनी शोध घेतला. मात्र कोणीच सापडले नाही.
लखन गोसावी यांचा यापूर्वी कोणासोबत वाद झाला होता का, याची पोलीस चौकशी करत आहेत. पूर्ववैमनस्यातून कोणी तरी हा प्रकार केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यामध्ये गोसावी यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची शाहूपुरी पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती. 

 

Web Title: At the beginning of the new year, four trains from the accustomed to the splurge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.