कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

By Admin | Updated: September 15, 2016 13:02 IST2016-09-15T09:15:51+5:302016-09-15T13:02:22+5:30

प्रथेप्रमाणे तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाचे सकाळी 8.25 वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली

Beginning of immersion in Kolhapur | कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 15 -  जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. प्रथेप्रमाणे तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाचे सकाळी 8.25 वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलिसप्रमुख  प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
 
सकाळपासूनच अनेक मंडळे मुख्य विसर्जन मार्गाकडे कूच करत असून दूपारनंतरच मिरवणुकीला खरी सुरुवात होईल.  बुधवारपासून शहरात पावसाचा शिडकावा होत असून सकाळीही पावसाची भूरभूर कायम राहिली.
 
 
गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझीम खेळताना खासदार धनंजय  महाडिक
 

Web Title: Beginning of immersion in Kolhapur