शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:23 IST

Dr. Shirish Valsangkar Case: एवढ्या मोठ्या डॉक्टरने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याने या घटनेबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासामधून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सोलापूरमधील प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळ्या झाडून जीवन संपवल्याने खळबळ उडाली होती. एवढ्या मोठ्या डॉक्टरने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याने या घटनेबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासामधून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, डॉक्टर वळसंगकर यांनी ज्या दिवशी जीवन संपवलं  त्या दिवशी दिवसभरात डॉक्टरांच्या मोबाईलवर सुमारे २७ फोन आले होते. तर डॉक्टरांनी जीवन संपवण्यापूर्वी रात्री आठ वाजल्यानंतर चार जणांना फोन केला होता, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आता डॉक्टरांनी अखेरच्या क्षणी ज्या चार जणांना फोन केले होते ते चारजण कोण, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, डॉक्टरांनी जिथे जीवन संपवले त्या घटनास्थळावरून पोलिसांनी डॉक्टरांचे रक्ताचे डाग असलेले कपडे, टॉवेल, नॅपकीन, जिवंत काडतूस, ओढलेल्या १९ सिगारेट्स, बुलेटमधील शिसे, बुलेटच्या वरील आवरण, पिस्टल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले असून, त्या रिपोर्टवरही अवलंबून आहे. याकडेही लक्ष असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

त्याशिवाय डॉक्टरांच्या बेडरूममधून ७० हजार रुपयांचा काळ्या रंगाचा मोबाइल, ग्रे कलरचा ६० हजारांचा दुसरा मोबाइल, एक पेन ड्राइव्ह, डॉक्टरांच्या नावे असलेला शस्त्र परवाना याशिवाय मनीषाने डॉ. आश्विन, डॉ. शिरीष वळसंगकर, साक्षीदार डॉ. उमा वळसंगकर यांना पाठवलेल्या ई-मेलची छायांकित प्रत जप्त केली. या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या मनीषा मुसळे माने हिला गुरुवारी वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तेव्हा मनीषाच्या स्वाक्षरीचे कागदपत्र, ई-मेलचे प्रिंट आऊट जप्त करण्यात आले. शिवाय डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे कागदपत्रही मिळाले. मात्र, मनीषाने जो माफीनामा दिला होता ती चिठ्ठी अन् संशयास्पद अन्य काही शोधण्यासाठी पोलिसांनी तिचे घर अन् हॉस्पिटल गाठले होते; पण काही हाती लागले नाही, अशी माहितीही समोर येत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र