बीड : ट्रक खाली चिरडून नर्सचा मृत्यूृ
By Admin | Updated: August 29, 2016 13:27 IST2016-08-29T13:24:03+5:302016-08-29T13:27:44+5:30
सिव्हिल हॉस्पीटलमधून बस स्थानकाकडे जात असताना महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात एका नर्सला आपला जीव गमवावा लागला.

बीड : ट्रक खाली चिरडून नर्सचा मृत्यूृ
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २९ - सिव्हिल हॉस्पीटलमधून बस स्थानकाकडे जात असताना महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात एका नर्सला आपला जीव गमवावा लागला तर दुस-या नर्सला गंभीर इजा पोहोचली आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास शिवाजी चौक परिसरात हा अपघात झाला.
बार्शी रोडवरील सिव्हिल हास्पीटलमध्ये माधुरी गोरे आणि शीला मुंडे या दोघी नर्स म्हणून काम करतात. सकाळी ड्युटीवर आल्यानंतर डॉ. आंधळे यांच्या परवानगीने या दोघी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी बसस्थानकाकडे निघाल्या होत्या. शिवाजी चौक परिसरात रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवत असतानाच पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडविले. या अपघातात माधुरी गोरे ट्रक खाली चिरडल्या गेल्या तर शीला मुंडे बाजुला फेकल्या गेल्या.