मुंबई - अजितदादा धनंजय मुंडे यांना पाठीशी घालतायेत. कशासाठी..? कोट्यवधीचा वाळू उपसा, परळी-गंगाखेड टप्प्यात, गाड्या कोणाच्या या लोकांच्याच..आका, आकाचे आका, आकाचे चुलत भाऊ...आम्ही राजीनाम्याची मागणी केली. १०० टक्के दादा पाठीशी घालतायेत. अजितदादा राजीनामा घेतील की नाही मला वाटत नाही. राजीनामा घ्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. अजित पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडेनेही राजीनामा दिला पाहिजे ही माझी प्रामाणिक मागणी आहे असं विधान आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस बोलत होते. धस म्हणाले की, जोपर्यंत तपास सुरू आहे तोपर्यंत तुम्ही पदावरून बाजूला जावं. त्या पदावर चिटकून का राहता..स्वत:हून राजीनामा द्यायला हवा. धनंजय मुंडेंचे नुकसान होणार नाही तर अजित पवारांचे होणार..जे लोक अजित पवारांच्या बाजूने वळलेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे इतके बेकार प्रकरण आहे. तुमच्या लोकांनी कशाकशाने मारले हे बघा, देशमुखांना मारणारे लोक धनंजय मुंडे यांचेच आहेत असं त्यांनी दावा केला.
तसेच संतोष देशमुख यांना फायटरने मारले, कत्तीने मारले. ४१ इंचाचा रॉडने मारले. मी सगळे सभागृहात बोललोय. आज एसआयटीने कोर्टात मांडले. या प्रकरणातील दोषी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे. त्यांना जामीन मिळायला नको. जर आका या प्रकरणात आत गेले तर परळीत हे बंद होईल. वाल्मिकी अण्णा बिश्नोईसारखा होईल. आतापर्यंत ते त्यांच्या मतदारसंघापुरते होते. परळीपुरते तुम्हाला सहन केले. तुम्ही जिल्ह्याचे बाप झाले का, त्या लेकराला कसं मारलंय असा संतप्त सवालही सुरेश धस यांनी केला.
दरम्यान, बीड प्रकरणी विरोधकांनी चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व चौकशी समिती नेमली आहे. माझ्याकडे संशयाने बघितले जाते तेव्हा मी त्यावर बोलणं उचित नाही. अतिशय व्यवस्थित तपास सुरू आहे. तपास पूर्ण होऊ द्या जे काही असेल समोर येईल. सध्या सगळं फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे. तपास पूर्ण होऊ द्या. अजित पवारांसोबत भेटीत काहीही चर्चा झाली नाही. मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर माझी आणि दादांची पहिली भेट होती. खात्याबाबतीत ज्या काही बैठका घेतल्या त्यात जे काही विषय समोर आले त्यावर अजितदादांसोबत चर्चा झाली असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.