बीड : पारोडी शेतवस्तीवर चबरी चोरी
By Admin | Updated: August 31, 2016 13:42 IST2016-08-31T13:41:26+5:302016-08-31T13:42:34+5:30
आष्टी तालुक्यातील पारोडी येथील शेतवस्तीवर चोरांनी धुमाकूळ घालत मंगळवारी पहाटे हजारोंचा ऐवज चोरुन नेला.

बीड : पारोडी शेतवस्तीवर चबरी चोरी
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ३१ - आष्टी तालुक्यातील पारोडी येथील शेतवस्तीवर चोरांनी धुमाकूळ घालत बुधवारी पहाटे हजारोंचा ऐवज चोरुन नेला. यावेळी शेतकरी कुटुंबीयास मारहाण देखील करण्यात आली. या घटनेने भीती निर्माण झाली आहे.
जालींदर दगडू सायंबर हे आपल्या कुटुंबीयासमवेत पारोडी येथील शेतवस्तीवर राहतात. पहाटे चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजावर मोठा दगड मारला. तकलादू असलेला दरवाजा या दगडाने तुटला. त्यानंतर चौघांनी आत प्रवेश करुन दहशत निर्माण केली. लोखंडी मेख उचलून एका चोराने जालींदर यांच्या पत्नी स्मिता यांच्या डोक्यात मारले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. कपाटातील दागिने व रोख १० हजार रुपये असा ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अंभोरा ठाण्यात सायंबर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक टाक करत आहेत.
तोंडाला रुमाल बांधून आले चोर
सायंबर यांच्या घरात चबरी चोरी करणाºया चारही चोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यामुळे त्यांचे चेहरे ओळखता आले नाहीत. या घटेनने सायंबर कुटुंबीय धास्तावले असून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.