बीड: ३ मुलांना विष पाजून मातेची आत्महत्या

By Admin | Updated: January 16, 2016 12:34 IST2016-01-16T11:23:17+5:302016-01-16T12:34:21+5:30

पोटच्या तीन मुलांना विष पाजून त्यांच्या मातेने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना बीडच्या अंबाजोगाईमध्ये घडली.

Beed: Mother's suicide by having 3 children poisoned | बीड: ३ मुलांना विष पाजून मातेची आत्महत्या

बीड: ३ मुलांना विष पाजून मातेची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत

बीड, दि. १६ - पोटच्या तीन मुलांना विष पाजून त्यांच्या मातेने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई पोलिस स्थानकाच्या मागे हा प्रकार घडला. शेख नूरजहाँ शेख फतरू असे मृत महिलेचे नाव असून तिने तिची तीन मुलं शेख नेहा शेख फतरू (१४), शेख तोहीद शएख फतरू (९) आणि शेख अफान शेख फतरू (४) यांना  रात्री विष पाजले आणइ त्यानंतर गळफास घेऊन स्वत:चे जीवनही संपवलं. मात्र तिने असं नेमकं का केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

नूरजहाँचा पती हा माजी सैनिक असून तो परळीच्या थर्मलमध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी करतो. काम संपवून तो सकाळ घरी आला असता बरा वेळ कोणीही दार उघडले नाही आणि त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Beed: Mother's suicide by having 3 children poisoned