बीड : जय महेश कारखान्याने अखेर कामगारांना घेतले कामावर
By Admin | Updated: July 19, 2016 20:33 IST2016-07-19T20:33:39+5:302016-07-19T20:33:39+5:30
माजलगाव येथे खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या जय महेश कारखान्याने अखेर माघार घेत काढून टाकलेल्या दोनशे कामगारांना मंगळवारी परत कामावर घेतले. याबाबत सोमवारी

बीड : जय महेश कारखान्याने अखेर कामगारांना घेतले कामावर
सर्वात प्रथम लोकमत ऑनलाईनवर झळकली होती बातमी.
बीड - माजलगाव येथे खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या जय महेश कारखान्याने अखेर माघार घेत काढून टाकलेल्या दोनशे कामगारांना मंगळवारी परत कामावर घेतले. याबाबत सोमवारी कामगारांनी कारखानास्थळी जोरदार निदर्शने केली होती.
माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे असलेल्या जय महेश साखर कारखान्याने ह्यलिव्ह आॅफह्णच्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना कुठलीही पूर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकले होते. दोनशे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. कामगारांच्या आंदोलनाची दखल माध्यमांनी घेतली होती. परिणामी जय महेश साखर कारखाना प्रशासन खडबडून जागे झाले.
कामगार, कारखाना व्यवस्थापन यांच्यातील वाद यापूर्वी देखील वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. मात्र यावेळी कारखाना प्रशासनाने मागचा-पुढचा विचार न करता चक्क दोनशे कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला होता. यामुळे गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.
कामगारांचे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसून येताच कारखाना प्रशासनाने मंगळवारी दोनशे कामगारांना पुन्हा कामावर घेतले आहे. यामुळे गोरगरीब कामगारांच्या कुटुंबांची उपासमार टळली आहे.
नोटीस चिकटवून केले होते कमी..
जय महेश साखर कारखाना प्रशासनाने कारखान्याच्या गेटवर काढून टाकलेल्या कामगारांची नावे व नोटीस चिकटवून काढून टाकल्याचे जाहीर केले होते. ही नोटीस आणि यादी पाहताच कामगार हादरुन गेले होते. आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे कामगारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अन्यायाविरोधात तडकाफडकी आवाज उठविला. लढ्याला यश आले आहे. कारखान्याची अर्थिक स्थिती खराब आहे. कामगारांचा तात्पूर्ता ह्यलिव्ह आॅफह्ण दिला होता. यापुढे लेबर कोर्टाचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. कामगारांना कायमचे काढले नव्हते
- एस. राधाकृष्णन, जय महेश कारखाना उपाध्यक्ष