वाल्मिक कराड प्रकरणामुळे मंत्रिपदापासून, राजकारणापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी एका शेतकरी महिलेने मुलीचे लग्न दिवाळीत आहे, कसे करणार, असे सांगत डोळ्यांतून अश्रू काढले. यावर धनंजय मुंडे यांनी तुमच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी माझी, मी सगळा खर्च करेन आणि ठरलेल्या वेळेत तिचे लग्न लावून देईन, असे आश्वासन दिले.
बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. परळी तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांमधील अतिवृष्टी नुकसान व पुरपरिस्थितीची मुंडे आज पाहणी करत आहेत. दरम्यान, तेलसमुख येथील एका शेतातील कापसाच्या उभ्या पिकाचे पावसाने नुकसान केले आहे. या शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत लग्न ठरले आहे. परंतू, या अस्मानी संकटामुळे हे लग्न कसे करावे असा प्रश्न या कुटुंबासमोर होता. धनंजय मुंडेंसमोर या महिला शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली.
यावेळी मुंडे यांनी शेतीच्या नुकसानीसाठी शासन आपली मदत करेल. पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका. ठरलेल्या वेळीच लग्न होईल, या लग्नाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो, असे सांगत आधार दिला.
Web Summary : Dhananjay Munde promised a distressed farmer he would cover all expenses for her daughter's Diwali wedding after crop losses due to floods. He assured her the wedding would happen as planned during his visit to Beed's flood-affected areas.
Web Summary : धनंजय मुंडे ने बाढ़ से फसल नुकसान के बाद एक दुखी किसान से वादा किया कि वह उसकी बेटी की दिवाली शादी का सारा खर्च वहन करेंगे। उन्होंने बीड़ के बाढ़ प्रभावित क्षेत्रों के दौरे के दौरान उन्हें आश्वासन दिया कि शादी योजनानुसार होगी।