एमटीएस परीक्षेत बेडेकर विद्यामंदिरचे सुयश

By Admin | Updated: July 2, 2016 03:41 IST2016-07-02T03:41:13+5:302016-07-02T03:41:13+5:30

विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. बेडेकर विद्यामंदिरच्या तिसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी एमटीएस परीक्षेत १०० टक्के यश मिळवले

Bedekar Vidyamandir's Suyash in MTS Exam | एमटीएस परीक्षेत बेडेकर विद्यामंदिरचे सुयश

एमटीएस परीक्षेत बेडेकर विद्यामंदिरचे सुयश


ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. बेडेकर विद्यामंदिरच्या तिसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी एमटीएस परीक्षेत १०० टक्के यश मिळवले असून यश जगदाळे या विद्यार्थ्याने ठाणे केंद्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
२०१५-१६ साठीची एमटीएसची परीक्षा ३० जानेवारी २०१६ रोजी घेण्यात आली होती. त्यात बेडेकर विद्यामंदिरला सुयश मिळाले. चौथी इयत्तेचा निकाल ९८.२५ टक्के लागला. चौथी इयत्तेतील परीक्षेला बसलेल्या ५७ विद्यार्थ्यांपैकी ५६ उत्तीर्ण झाले. त्यातीलही आदित्य साजेकर हा विद्यार्थी ठाणे केंद्रात चौथा, तर साहिल खोत हा पाचवा आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bedekar Vidyamandir's Suyash in MTS Exam