बीएड, एमएडची सीईटी २५ रोजी
By Admin | Updated: July 4, 2015 03:15 IST2015-07-04T03:15:50+5:302015-07-04T03:15:50+5:30
राज्यातील शासकीय, अशासकीय अध्यापक महाविद्यालयांतील बी.एड. आणि एम.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता उच्च शिक्षण संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी

बीएड, एमएडची सीईटी २५ रोजी
मुंबई : राज्यातील शासकीय, अशासकीय अध्यापक महाविद्यालयांतील बी.एड. आणि एम.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता उच्च शिक्षण संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना १७ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.
उच्च शिक्षण संचालनालयाने बी.एड. व एम.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बी.एड.चा प्रवेश अर्ज उमेदवारांना http://bed.mhpravesh.inया संकेतस्थळावर भरता येईल; तर एम.एड.च्या प्रवेशासाठी उमेदवारांना http://med.mhpravesh.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. प्रवेश अर्जासह माहिती पुस्तिका उमेदवारांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन्ही परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरल्यानंतर १९ ते २५ जुलै या कालावधीत हॉल तिकीट आॅनलाइन उपलब्ध होणार आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे आॅप्शन फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया ७ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)