मिहानसाठी स्कीलफुल व्हा
By Admin | Updated: February 2, 2015 01:09 IST2015-02-02T01:09:58+5:302015-02-02T01:09:58+5:30
मिहानला आता गती प्राप्त झाली आहे पण ही गती प्राप्त होण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आतापर्यंत वेळ गेला. मिहानची प्रत्यक्ष प्रगती दिसत नसल्याने अकारण नकारात्मकता

मिहानसाठी स्कीलफुल व्हा
मान्यवरांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास : रोजगाराच्या भविष्यात अधिक संधी
नागपूर : मिहानला आता गती प्राप्त झाली आहे पण ही गती प्राप्त होण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आतापर्यंत वेळ गेला. मिहानची प्रत्यक्ष प्रगती दिसत नसल्याने अकारण नकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण आता मिहानमध्ये सध्या ८ हजार लोक नोकरी करीत आहेत. अनेक कंपन्यांचे काम गतीने सुरू आहे. येणाऱ्या काळात मिहानमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. ही संधी कॅश करण्यासाठी तयार रहा. केवळ पदवीने ही संधी मिळणार नाही त्यासाठी आवश्यक कौशल्याचीही गरज भासणार आहे. टीसीएस, इन्फोटेक, बोर्इंग सारख्या कंपन्या या वर्षात लवकरच काम सुरू करीत आहेत. येथे केवळ नोकरी शोधण्यापेक्षा युवकांनी स्वत:चा उद्योग उभा करण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे कारण मिहानमध्ये अनेक संधी आहेत. आता खऱ्या अर्थाने मिहानचे काम सुरू झाले आहे त्यामुळे प्रत्येकालाच रोजगार मिळणार आहे. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे येथे नोकऱ्यांची फार मोठी उपलब्धता भविष्यात आहे. उद्योगांना लागणारे साऱ्याच पंचतारांकित सोयी आणि वीज, पाणी मुबलक प्रमाणात येथे उपलब्ध असल्याने देशभरातील कंपन्यांचा ओघ मिहानकडे वळला आहे. अशी संधी विदर्भासाठी न भूतो न भविष्यती असून पदवीसह कौशल्य मिळवा आणि नोकरी मिळवा, उद्योग उभारा, असा मंत्र आज तज्ज्ञ मान्यवरांनी युवक-युवतींना दिला.
ंनोकरी घेणारे नाही देणारे व्हा. त्यासाठी उद्योग उभारा. स्वत:ची क्षमता ओळखा. लोक हसतील, वेड्यात काढतील तेव्हा समजा तुमचा मार्ग योग्य आहे, असे मत डॉ. पी. बी. काळे यांनी व्यक्त केले.
ंपदवी ही पात्रता झाली पण स्कील ही गरज आहे. मेक इन इंडिया करायचे असेल तर छोटे का होईना उद्योगच उभारा. उद्योगासाठी पैसा नव्हे जिद्द आणि परिश्रमाची गरज आहे. कौशल्य प्राप्त करा आणि स्वत:साठी त्याचा उपयोग करुन उद्योजक व्हा, असा मंत्र कुणाल पडोळे यांनी दिला.
ंमिहानमध्ये नोकरी शोधणारे लोक नोकरीच करीत राहतील. पण काही युवकांनी तरी येथे उद्योग उभारण्याचा प्रयत्न करा. मोठे स्वप्न पाहणारे लोकच मोठे होऊ शकतात. मिहानमध्ये उद्योग उभारण्यासाठी खूप संधी आणि सवलती मिळत आहे. याचा लाभ उद्योजक म्हणून आपण का घेऊ नये, असे मत आ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.
ंमिहानमध्ये एमएडीसीने सर्व सोयी आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. उद्योगांना लागणाऱ्या सोयी उपलब्ध असल्याने येत्या काळात अनेक कंपन्यांचे लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. त्यासाठी तयार राहा,असे दीपक जोशी म्हणाले.
ंमिहानमध्ये प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे संधी. त्यासाठी आपण तयार राहायला हवे. निर्यातीकडे लक्ष द्या आणि विदर्भाचा विकास करा, असे मत देवेंद्र पारेख यांनी व्यक्त केले.