‘कलेक्टर बंगल्याचे वारसदार व्हायचं.. बंगल्यात या; झाड लावा-जगवा!’

By Admin | Updated: June 28, 2016 01:53 IST2016-06-28T01:53:25+5:302016-06-28T01:53:25+5:30

जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची विद्यार्थ्यांंसाठी संकल्पना

'Become the inheritor of the collector's bungalow ... in the bungalow; Plant trees! ' | ‘कलेक्टर बंगल्याचे वारसदार व्हायचं.. बंगल्यात या; झाड लावा-जगवा!’

‘कलेक्टर बंगल्याचे वारसदार व्हायचं.. बंगल्यात या; झाड लावा-जगवा!’

संतोष येलकर/अकोला
राज्यात १ जुलै रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत ह्यज्या विद्यार्थ्यांंना कलेक्टर व्हायचं आहे, अशा विद्यार्थ्यांंनी कलेक्टर बंगल्यात येऊन झाड लावावं, लावलेलं झाड जगवत अभ्यास करावा आणि कलेक्टर बंगल्याचे वारसदार व्हावंह्ण ही संकल्पना राबविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केला आहे.
१ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यात विविध विभागामार्फत २ लाख ८६ हजार ९१९ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्‍चित करण्यात आले आहे. ठरविण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पार करून जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी भर देत आहेत. त्यामध्येच वृक्ष लागवडीतून विद्यार्थ्यांंना प्रेरणा मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांंंना जीवनात जिल्हाधिकारी व्हायचे आहे, जिल्हाधिकारी शासकीय निवासस्थानाचे वारसदार होण्याचे ज्यांचे ध्येय आहे, अशा विद्यार्थ्यांंनी जिल्हाधिकारी बंगल्यात यावे, झाड लावावे, लावलेल्या झाडाचे संगोपन करताना, अभ्यास करावा आणि जिल्हाधिकारी होण्याचे ध्येय पूर्ण करावे, अशी संकल्पना जिल्हाधिकारी राबविणार आहेत. एरव्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांंंना जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय बंगल्यात प्रवेश नसतो, जिल्हाधिकार्‍यांचा बंगला कसा असतो, हे विद्यार्थ्यांंंना माहीत नसते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या बंगल्याची विद्यार्थ्यांंंना नवलाई असते; परंतु जिल्हाधिकारी बंगल्याचे वारसदार आपण होऊ शकतो, अभ्यास आणि परिश्रमाच्या आधारे आपणही ह्यकलेक्टरह्ण होऊ शकतो, असे उद्दिष्ट असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंंसाठी जिल्हाधिकार्‍यांनी हा संकल्प केला असून यामध्ये विद्यार्थ्यांंंनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
 

Web Title: 'Become the inheritor of the collector's bungalow ... in the bungalow; Plant trees! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.