शिवसेनेमुळेच मुंंबईत शांतता, सलोखा- खा. राहुल शेवाळे
By Admin | Updated: June 12, 2016 20:45 IST2016-06-12T20:45:42+5:302016-06-12T20:45:42+5:30
मुंबईत सामाजिक सलोखा, शांतता, अन प्रत्येक घटकाला मानसन्मान मिळत असल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकर सेनेला प्राधान्य देतील असा विश्वास खा. राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला

शिवसेनेमुळेच मुंंबईत शांतता, सलोखा- खा. राहुल शेवाळे
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 12 - शिवसेनेमुळे मुंबईत सामाजिक सलोखा, शांतता, अन प्रत्येक घटकाला मानसन्मान मिळत असल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकर सेनेला प्राधान्य देतील असा विश्वास खा. राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.
आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये सेनेचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी रविवारी ते पंढरपुरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना खा. शेवाळे म्हणाले की, शिवसेना पक्षाचे ध्येयधोरण आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेसाठी पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवरथाचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून हा शिवरथ १५ ते १९ जूनदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात नेण्यात येणार आहे. गेल्या ५० वर्षांतील शिवसेनेचे सामाजिक कार्य, शिवसेनाप्रमुखांचे विचार, व्यंगचित्रे, लोकाभिमुख योजना या शिवरथाच्या माध्यमातून नागरिकांना दाखविण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला चांगले भवितव्य आहे. आगामी निवडणुकीत सेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, शहरप्रमुख संदीप केंदळे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, राहुल पाटील, साईनाथ अभंगराव, धनंजय डिकोळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अस्मिताताई गायकवाड, गणेश वानकर, जिल्हा ग्राहक संरक्षक जिल्हाप्रमुख डॉ. बी. पी. रोंगे, उत्तमप्रकाश खंदारे, समाधान आवताडे, वेताळा भगत, स्वप्नील वाघमारे, बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते.