शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पंकजा मुंडेंमुळे मंत्रिपदाची संधी हुकली - मेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:25 IST

बीड : माझ्या मंत्रिपदाच्या वाटेत पालकमंत्री पंकजा मुंडे मांजरासारख्या आडव्या आल्या. सत्ता आल्यापासून मागील साडेचार वर्षांत शिवसंग्राम संपविण्याचे मनसुबे ...

बीड : माझ्या मंत्रिपदाच्या वाटेत पालकमंत्री पंकजा मुंडे मांजरासारख्या आडव्या आल्या. सत्ता आल्यापासून मागील साडेचार वर्षांत शिवसंग्राम संपविण्याचे मनसुबे त्यांनी रचले. आम्हाला विरोध आणि आमच्या विरोधकांना मदत केली. तसेच दुष्काळी परिस्थितीत आम्ही सांगितलेल्या ठिकाणी छावण्या आणि टँकरसुद्धा मिळू दिले नाहीत. दुष्काळातही शेतकऱ्यांसोबत गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, शेतकरीपुत्राच्या पाठीशी शिवसंग्रामची ताकद उभी करा, असे म्हणत आ. विनायक मेटे यांनी राज्यात भाजपाला तर बीडमध्ये राष्ट्रवादीला साथ देण्याची भूमिका शिवसंग्रामच्या गुरुवारी बीड येथे झालेल्या मेळाव्यात घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन आम्ही जिल्हा परिषदेत मदत केली, त्याठिकाणी देखील आम्हाला संपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होत असल्यामुळे बीडच्या निवडणुकीत शिवसंग्रामची संपूर्ण ताकद शेतकरी पुत्राच्या पाठीशी उभी करा, असे आवाहन मेटे यांनी कार्यकर्त्यांना केले.

बीड लोकसभेची या वेळेसची निवडणूक अत्यंत रंगतदार होत आहे. मागील आठवड्यात क्षीरसागर बंधूंनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपच्या प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. क्षीरसागर बंधू नंतर जिल्ह्यात असंतुष्ट असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात होत असलेल्या कोंडीमुळे मेटे यांनी समर्थकांच्या बैठकीत भाजपचा जिल्ह्यात प्रचार करणार नाही, परंतु राज्यात मात्र युतीचा घटक म्हणून भाजपसोबत असेल, असे जाहीर केले होते. त्यांची ही दुहेरी भूमिका भाजप श्रेष्ठींनाही आवडली नाही. कोणताही एकच निर्णय घ्या. राज्यात सोबत असाल तर बीड जिल्ह्यातही भाजपसोबत काम करावे लागेल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते. 

या पार्श्वभूमीवर मेटे यांनी आज  कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. मेळाव्यात त्यांनी शिवसंग्रामचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर केला. जिल्ह्यातील आगामी राजकारण पाहता मेटेंनी जिल्ह्यात त्यांची झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

मुंडे यांच्याकडून फारसे महत्व नाही  

पंकजा मुंडे यांनीही मेटे यांच्या ‘असहकार्य’च्या भूमिकेला फारसे महत्त्व न देता शिवसंग्रामचेच दोन जि. प. सदस्य फोडून चोख उत्तर दिले होते. यानंतरही पत्रकारांशी संवाद साधताना आपण मेटेंशी या विषयावर बोलणार नाही, कारण त्यांनी हा निर्णय घेतला, असे सांगून विषय बंद केला. भाजपच्या शिस्तीत मेटेंचे हे वागणे बसत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंडेंकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस