शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सासू - सासऱ्यांनी केली मारहाण; गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:29 IST

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो येथील युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना

मूर्तिजापूर :

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो येथील युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. हितेश बबनराव मोरे (२७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.सिरसो येथील २७ वर्षीय युवक हितेश (छोटू) बबनराव मोरे याने आपल्या राहत्या घरात घरी कोणीच नसताना छताच्या पंख्याला स्वेटरने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. हितेश याची पत्नी दोन लहान मुलींना घेऊन काही महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली, मुलांना भेटण्यासाठी हितेश शुक्रवारी सासुरवाडीत गेला होता, दद्वतच पत्नी व मुलींना घेऊन या बेताने तो गेला होता, दरम्यान शनिवारी सकाळी ११ वाजता हितेश याने आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना फोन करुन मुलींना भेटू न देता आपल्या सासू व साऱ्यांनी मारहाण केली म्हणून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. सदर प्रकार पोलीस हितेशच्या घरी पोहोचल्यावर शेजाऱ्यांना समजला पोलीसांनी घराचे दार तोडून बघीतले तर तोपर्यंत हितेश गतप्राण झाला होता, हितेश याला एक चार वर्षांची व दोन वर्षाची मुलगी आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी