जबाबदार सत्ताधारी पक्ष बना

By Admin | Updated: August 18, 2014 23:41 IST2014-08-18T23:41:26+5:302014-08-18T23:41:26+5:30

विरोधी पक्ष म्हणून निषेध, आंदोलने करायची आपल्याला सवय आहे. मात्र, आता आपली भूमिका बदलली आहे. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपण काम केले,

Be responsible responsible parties | जबाबदार सत्ताधारी पक्ष बना

जबाबदार सत्ताधारी पक्ष बना

>पुणो : विरोधी पक्ष म्हणून निषेध, आंदोलने करायची आपल्याला सवय आहे. मात्र, आता आपली भूमिका बदलली आहे. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपण काम केले, पण आता जबाबदार सत्ताधारी पक्ष बनायची गरज आहे . त्यामुळे आपली विचार करायची पद्धत बदलायला हवी. असा सल्ला केंद्रीय परिवहन, महामार्ग, जहाज आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षकार्यकत्र्याना दिला. आमदार गिरीश बापट यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय सचिव श्याम जाजू, खासदार अनिल शिरोळे, आमदार चंद्रकांत मोकाटे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश गोगावले, अजय भोसले, महेंद्र कांबळे इत्यादी उपस्थित होते. 
गडकरी म्हणाले, ‘‘एकेकाळी पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला, तरी अप्रूप वाटायचे. त्या पाश्र्वभूमीवर पक्षाला जे घवघवीत यश मिळाले आहे, ते कार्यकत्र्यामुळे आहे, हे विसरता कामा नये. आता आपण व्हिलन नाही, तर हिरो आहोत. या दोन्ही भूमिका यशस्वीपणो निभावणारे खूप कमी आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून, आपण देशाचे भाग्यविधाते आहेत, हे सिद्ध करायला हवे.’’
देशाला पुढे न्यायचे, तर 5क् वर्षे पुढचा विचार करावा लागेल. आपल्याकडे जी बुद्धी आहे, ती देशासाठी वापरणो, हाच सुशासनाचा अर्थ आहे. यासाठी जनतेला शिक्षण, रोजगार, घर, वीज मिळायला हवे. ज्यांच्यावर जनतेने इतकी वर्षे विश्वास टाकला, त्यांनी महागाई वाढवली, जात, संप्रदायाचे राजकारण केले. राज्यात सिंचनासाठी 7क् हजार कोटी खर्च झाले, पण सिंचन फक्त क्.क्1 टक्का झाले. कृषिमंत्र्याच्या राज्यातला कृषीदर हा अतिशय कमी आहे.  यामुळेच पक्षाला मिळालेला कौल हा विकासाच्या राजकारणाचा आहे. केवळ मोदी लाटेवर अवलंबून न राहता पूर्ण ताकद लावून राज्यात आपला ङोंडा फडकवायचा आहे व दोन वर्षात परिस्थिती बदलायचे आव्हानही स्वीकारायचे आहे, असेही ते म्हणाले. गिरीश बापट यांनी प्रास्ताविक केले. शिरोळे, गोगावले यांचीही भाषणो झाली. (प्रतिनिधी)
 
आम्ही पुढे गेलो, तुमचे 25 नगरसेवकच..
पूर्वी आम्ही नागपूरमधील कार्यकत्र्याना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्याचे उदाहरण द्यायचो. त्यानंतर नागपूर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 78 झाली आहे, तरी पुणो महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक केवळ 25 राहिले आहेत, असा टोला नितीन गडकरी यांनी पदाधिका:यांना जाहीरपणो मारला. 
 
सामान्य माणूस केंद्रबिंदू धरून त्याची सेवा करायची, ही शिकवण मला पक्षाने दिली. त्याच पद्धतीने आजवर काम करत आलो. आपल्याला विश्वासाने निवडून दिलेल्या जनतेला आपल्या कामाचा अहवाल द्यायला हवा, हे मी रामभाऊ म्हाळगी यांच्याकडून शिकलो. नितीन गडकरी हे महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार आहेत. 
- गिरीश बापट, आमदार 
 
मेट्रोसाठी शहर काँग्रेसचे 
भाजपा खासदारांना साकडे 
पुणो : पुणो शहरातील मेट्रो तातडीने मंजूर करण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने आज करण्यात आली़ यासाठी शहर कॉँग्रेसच्या पदाधिका:यांनी खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेऊन त्यांनी पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. 
शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड़ अभय छाजेड, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, नगरसेवक संजय बालगुडे,  मुकारी अलगुडे, अजित आपटे यांनी  
शिरोळे यांची भेट घेतली़ तसेच, 
या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना तातडीने पत्र पाठवून पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली़ 
पुणो शहराच्या मेट्रो प्रकल्पास ऑक्टोबर 2क्13मध्ये, तर नागपूरच्या प्रस्तावास जानेवारी 2क्14मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आह़े त्यानंतर या प्रकल्पास  संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी  सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आह़े मंगळवारी केवळ नागपूरच्या मेट्रोला मंजुरीसाठी मंत्रिमंडळाची बैठक होणार आह़े परंतु, महाराष्ट्राच्या प्रगतीत नागपूरइतकाच पुण्याचाही वाटा असताना पुण्याबरोबरच हा दुजाभाव होता कामा नय़े त्या दृष्टीने नागपूरबरोबर पुण्याच्या मेट्रोचा विचार व्हावा, यासाठी अनिल शिरोळे यांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली़ 
 
एकेकाळी पुणो हे सुंदर शहर होते. आता ते ओळखले जाते प्रदूषण, वाहतूककोंडीसाठी. नागपूर महापालिक ा मागून येऊन सगळ्याच बाबतींत पुण्याच्या पुढे गेली. हे का होते, याचा विचार करताना आत्मचिंतन करायला हवे. 
महायुतीत चांगले वातावरण आहे. याउलट काँग्रेसची स्थिती वाईट आहे. जिथे पक्षाची ताकद चांगली आहे, तिथे नवीन बाहेरच्या नेतृत्वाला प्रवेश नाही. नाही तर मग वर्षानुवर्षे काम करणा:या आमच्या कार्यकत्र्याना कधी संधी मिळणार? 
- नितीन गडकरी
 

Web Title: Be responsible responsible parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.