शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा; धनगर आरक्षणावरून पडळकरांचा शिंदे सरकारलाच इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 10:56 IST

सर्व धनगर समाजाने २१ नोव्हेंबरला राज्यातील सर्व तहसिल कार्यालये, प्रांत अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांवर जाऊन निवेदन द्यावे, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे. 

मराठा आरक्षणावरून राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वातावरण तापलेले असताना आता ओबीसी समाजाने देखील आरक्षण बचाव आंदोलन सुरु केले आहे. यातच मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या धनगर समाजाने आता हालचाली सुरु केल्या असून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. 

एकनाथ शिंदे, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी तुम्हाला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे. तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही. फक्त  विशिष्ट समाजासाठी आपली वाटेल ते करायची तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्या बद्दल होत आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.  

आघाडी सरकारने आरक्षण नाकारून धनगर जमातीवर अन्याय केला. शिंदेंच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होईल, ही आशा सामान्य धनगरांना होती. मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे.  समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही, ही भावना समान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे, असे पडळकर म्हणाले. 

वेळीत योग्य पावले उचलावी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला व आंदोलनाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देत आहे. सर्व धनगर समाजाने २१ नोव्हेंबरला राज्यातील सर्व तहसिल कार्यालये, प्रांत अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांवर जाऊन निवेदन द्यावे, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरEknath Shindeएकनाथ शिंदेDhangar Reservationधनगर आरक्षण