विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक व्हा - पवार
By Admin | Updated: October 16, 2015 03:05 IST2015-10-16T03:05:36+5:302015-10-16T03:05:36+5:30
बहुजनांची मुले शिकून मोठी व्हावीत, यासाठी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच आग्रही राहिला. मात्र आताचे युती सरकार विद्यार्थ्यांच्या सवलती बंद करत आहे

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक व्हा - पवार
मुंबई : बहुजनांची मुले शिकून मोठी व्हावीत, यासाठी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच आग्रही राहिला. मात्र आताचे युती सरकार विद्यार्थ्यांच्या सवलती बंद करत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमण होत आंदोलनासाठी तयार व्हावे, असे आवाहन आ. अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राज्यव्यापी बैठकीत ते बोलत होते.
सध्या शिक्षणात भगवीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र व राज्य सरकार
पैकी कुणीही अभ्यासक्रमात भगवीकरणाचे
विचार घुसवण्याचा प्रयत्न करणार असेल
तर तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी
तुम्हाला उभे रहावे लागेल, असे आवाहननही पवारांनी केले.
बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.निरंजन डावखरे,
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व युवक उपाध्यक्ष नीलेश राऊत, प्रदेश सरचिटणीस प्रसाद लाड, युवक उपाध्यक्ष सलील देशमुख, रविकांत वर्पे,
विद्यार्थी उपाध्यक्ष बाळासाहेब महामूलकर इत्यादी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)