बीडीडी चाळींचा पुनर्विकास
By Admin | Updated: April 11, 2015 00:11 IST2015-04-11T00:11:30+5:302015-04-11T00:11:30+5:30
मुंबईत चार ठिकाणी असलेल्या २०७ बीडीडी चाळी जीर्ण झाल्या असल्याने त्यांची दुरुस्ती अशक्य असून पुनर्विकास करणे अपरिहार्य असल्याची कबुली,

बीडीडी चाळींचा पुनर्विकास
मुंबई : मुंबईत चार ठिकाणी असलेल्या २०७ बीडीडी चाळी जीर्ण झाल्या असल्याने त्यांची दुरुस्ती अशक्य असून पुनर्विकास करणे अपरिहार्य असल्याची कबुली, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. याच वर्षी या चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी ग्वाही दिली.
त्यावर मंत्री पाटील म्हणाले की, ९२.६१ एकर जमिनीवरील या २०७ बीडीडी चाळींत १६ हजार ५५३ गाळे असून त्यामध्ये ८० हजार रहिवाशी वास्तव्य करतात. या चाळींच्या दुरुस्तीवर गेल्या सहा वर्षांत १४० कोटी रुपये खर्च केले. दरवर्षी या चाळींच्या दुरुस्तीवर १५ कोटी रुपयांचा खर्च येतो. या सर्व इमारती दुरुस्ती करण्याच्या पलीकडे जीर्ण झाल्याने पुनर्विकास अपरिहार्य आहे.