‘सर्किट बेंच’साठी आता ‘आर-पार’ची लढाई
By Admin | Updated: September 14, 2015 02:05 IST2015-09-14T02:05:03+5:302015-09-14T02:05:03+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन होत नाही तोपर्यंत ‘आर-पार’ची लढाई करण्याचा निर्धार सहा जिल्ह्यांतील वकिलांनी केला

‘सर्किट बेंच’साठी आता ‘आर-पार’ची लढाई
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन होत नाही तोपर्यंत ‘आर-पार’ची लढाई करण्याचा निर्धार सहा जिल्ह्यांतील वकिलांनी केला. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी याबाबत निर्णय प्रलंबित ठेवला. त्यामुळे सर्किट बेंच स्थापनेसाठी व न्या. शहा यांच्या निषेधार्थ वकिलांनी तीन दिवस ‘काम बंद’ आंदोलन केले होते. ास सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)