शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमा फिक्शन नव्हे तर फॅक्ट - रमेश थेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 02:06 IST

‘The Battle of Bhima Koregaon’ : 'भीमा कोरेगाव हा वर्तमानात प्रचंड वादाचा विषय आहे. एका अर्थाने समाजात दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे, नेमके सत्य काय ते या चित्रपटातून पुढे येईल.'

नागपूर : इतिहासातील भीमा कोरेगावची लढाई आता रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. सुमारे २०० वर्षापूर्वी १८१८ मध्ये घडलेला हा घटनाक्रम माजी आयएएस अधिकारी रमेश थेटे यांनी ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात मांडला आहे. हा बहुचर्चित हिंदी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असून, लवकरच प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होणार आहे. हा सिनेमा फिक्शन नाही तर वास्तवातील घटनांचा शोध, अभ्यास करून साकारलेला वास्तववादी सिनेमा असल्याचे रमेश थेटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भीमा कोरेगाव हा वर्तमानात प्रचंड वादाचा विषय आहे. एका अर्थाने समाजात दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे, नेमके सत्य काय ते या चित्रपटातून पुढे येईल. भीमा कोरेगावचा लढा हा कोण्या समाजाविरुद्ध नसून ती आत्मसन्मानाची लढाई होती, हेच या इतिहासाच्या दाखल्यांवरून स्पष्ट होते. हा सिनेमा हीच फॅक्ट सादर करेल. त्यामुळे, दोन समाजातील तेढ दूर होऊन सामाजिक सलोखा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे रमेश थेटे म्हणाले. ‘तुम्हाला तुमचा इतिहास माहीत नसेल तर तुम्ही इतिहास घडवू शकत नाही’. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ साली भीमा कोरेगाव स्मारकाला भेट दिली होती, तेव्हा म्हटले होते. तोच धागा पकडून हा चित्रपट बनवला आहे. इतिहास सांगायचा असेल तर आजच्या घडीला चित्रपटाशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही. मनोरंजनासोबत सत्य घटनाक्रम आणि प्रबोधन याचा ताळमेळ साधत हा चित्रपट बनवल्याचे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षापासून चित्रपटाची तयारी सुरू होती. मोडी लिपी तज्ज्ञ पुण्याचे अशोक नागरे, दत्ता नलावडे, प्रा. प्रेम हनुवते यांच्यासारख्या अनेक इतिहासकार, संशोधक, या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या ब्रिटिश कॅप्टन स्टॉन्टन याची दैनंदिनी व तत्कालीन नोंदकारांच्या दस्तऐवजांचा आधार घेऊन हा सिनेमा रुपेरी पडद्यावर उतरला आहे. नागपूर : इतिहासातील भीमा कोरेगावची लढाई आता रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. सुमारे २०० वर्षापूर्वी १८१८ मध्ये घडलेला हा घटनाक्रम माजी आयएएस अधिकारी रमेश थेटे यांनी ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात मांडला आहे. हा बहुचर्चित हिंदी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असून, लवकरच प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होणार आहे. हा सिनेमा फिक्शन नाही तर वास्तवातील घटनांचा शोध, अभ्यास करून साकारलेला वास्तववादी सिनेमा असल्याचे रमेश थेटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भीमा कोरेगाव हा वर्तमानात प्रचंड वादाचा विषय आहे. एका अर्थाने समाजात दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे, नेमके सत्य काय ते या चित्रपटातून पुढे येईल. भीमा कोरेगावचा लढा हा कोण्या समाजाविरुद्ध नसून ती आत्मसन्मानाची लढाई होती, हेच या इतिहासाच्या दाखल्यांवरून स्पष्ट होते. हा सिनेमा हीच फॅक्ट सादर करेल. त्यामुळे, दोन समाजातील तेढ दूर होऊन सामाजिक सलोखा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे रमेश थेटे म्हणाले. ‘तुम्हाला तुमचा इतिहास माहीत नसेल तर तुम्ही इतिहास घडवू शकत नाही’. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ साली भीमा कोरेगाव स्मारकाला भेट दिली होती, तेव्हा म्हटले होते. तोच धागा पकडून हा चित्रपट बनवला आहे. इतिहास सांगायचा असेल तर आजच्या घडीला चित्रपटाशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही. मनोरंजनासोबत सत्य घटनाक्रम आणि प्रबोधन याचा ताळमेळ साधत हा चित्रपट बनवल्याचे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षापासून चित्रपटाची तयारी सुरू होती. मोडी लिपी तज्ज्ञ पुण्याचे अशोक नागरे, दत्ता नलावडे, प्रा. प्रेम हनुवते यांच्यासारख्या अनेक इतिहासकार, संशोधक, या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या ब्रिटिश कॅप्टन स्टॉन्टन याची दैनंदिनी व तत्कालीन नोंदकारांच्या दस्तऐवजांचा आधार घेऊन हा सिनेमा रुपेरी पडद्यावर उतरला आहे. 

संकल्पना, गीत, संगीत, दिग्दर्शन व निर्मितीरमेश थेटे हे गेले ३५ वर्ष आयएएस अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते. ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’च्या कथेची संकल्पना, पाचही गीत, संगीत, गायन, चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती स्वत: थेटे यांनी  केली आहे. रमेश थेटे फिल्म्स अंतर्गत हा बिग बजेट सिनेमा साकारला गेला आहे. विशेष म्हणजे, याचे हेडक्वॉर्टर नागपूर आहे. यात प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल याची असून, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री दिगांगणा सूर्यवंशी, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, अभिमन्यू सिंग, मिलिंद गुणाजी, गोविंद नामदेव, यतीन कारेकर आदींच्या भूमिका आहेत.

पुण्यात १७९५ ते १८१८ या काळात अस्पृश्यांवर प्रचंड अत्याचार वाढले होते. राज्यकर्त्यांमध्ये न्याय देण्याची दानत संपली होती. समतेच्या लढाईत लक्ष्य ठरले असेल तर शक्ती पणाला लागते आणि ती संधी १८१८ मध्ये सापडली. त्या असंतोषाची ऊर्जा ज्वालामुखीत रुपांतरित झाली, त्याचे नाव ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ होय. ही लढाई जातीविरुद्ध नव्हती तर वृत्तीविरुद्ध होती, हे महत्त्वाचे.     - रमेश थेटे : दिग्दर्शक, निर्माता

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार