शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी चढाओढ

By admin | Updated: April 18, 2016 01:40 IST

मुंबई, पुण्यानंतर महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. विद्यमान आयुक्त प्रभात रंजन

- जमीर काझी,  मुंबई

मुंबई, पुण्यानंतर महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. विद्यमान आयुक्त प्रभात रंजन महासंचालकाच्या बढतीसाठी पंधरवड्यापूर्वीच पात्र ठरले असताना त्या जागेचा उत्तराधिकारी निश्चित होत नसल्याने बढती रखडली आहे. त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) महासंचालक, राज्य गुप्त वार्ता विभागाचे (एसआयडी) आयुक्त या महत्त्वाच्या पदांवर अद्याप पूर्णवेळ नियुक्त्या झालेल्या नाहीत.त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात गृह विभागाच्या सुस्ताईबाबत टीका करणारे भाजपा-युती सरकारचा कारभार आता त्याचपद्धतीने सुरु आहे. पूर्वी नियुक्तीसाठी ‘बारामती’ला नवस करावा लागत होता, आता नागपूरातील मठात ‘फिल्डिंग’ लावावी लागते, एवढाच फरक झाल्याची प्रतिक्रिया पोलीस वर्तुळातून होत आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदासाठी एसीबीचे अपर महासंचालक संजय बर्वे, एटीएसचे प्रमुख विवेक फणसाळकर, नागपूरचे आयुक्त एसपीएस यादव, क्राईम ब्रँचचे अतुल कुलकर्णी यांच्या नावामध्ये चढओढ सुरु आहे.गेल्यावर्षी ३१ डिसेंबरला अतुलचंद्र कुलकर्णी यांची पदोन्नती झाली मात्र चार महिने होउनही अन्यत्र नियुक्ती करण्यात आलेली नाही. २९ फेबु्रवारीला एसीबीचे महासंचालक विजय कांबळे सेवानिवृत्त झाले. तर ३१ मार्चला एसआयडीच्या रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. या विलंबामागील नेमकी कारणे काय, असा सवाल अधिकाऱ्यांतून विचारला जात आहे. गतीमान कारभाराची ग्वाही देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खात्याची धुरा असताना याबाबत होणाऱ्या दुर्लक्षाकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस महासंचालकानंतर दुसऱ्या दर्जाचे मानले जाणाऱ्या ‘एसीबी’च्या प्रमुुखपदी गेल्या दीड महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नाही. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रमाणचे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा सहभाग असलेल्या जलसंपदा विभागाच्या गैरव्यवहारचा तपास या विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे याठिकाणी जबाबदार प्रमुख असण्याची नितांत गरज आहे. पण त्याचा पदभार अपर महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे आहे. वास्तविक त्यांचे नाव मुंबईच्या आयुक्तपदासाठी चर्चेत होते. मात्र आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांचे नाव असल्याने ते मागे पडले. त्याची भरपाई म्हणून एसीबीचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला. विभागातील अपर महासंचालकाचे दुसरे पद रिक्त असल्याने त्याचीही धुरा त्यांच्याकडे आहे. बर्वे यांची नवी मुुंबईच्या आयुक्तपदासाठी निवड न झाल्यास आणखी काहीकाळ तेच विभागाचे प्रभारी राहतील, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. एसीबीच्या प्रमुखपदी ज्येष्ठतेनुसार पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक सतीश माथूर किंवा ‘होमगार्ड’चे प्रमुख राकेश मारिया यापैकी एकाची निवड होणे आवश्यक आहे. संजय वर्मा यांचे जोरदार प्रयत्न ‘एडीजी’ची पदे रिक्त असून त्यासाठी अव्वल स्थानावर असलेल्या कोल्हापूरचे आयजी संजय वर्मा यांनीही पदोन्नतीवर नवी मुंबईच्या आयुक्तपदासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मुख्यमंत्री, गृहसचिव व डीजीकडे अनेक तक्रारी आल्या आहेत.तक्रारदारामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिवरिष्ठ अधिकारी त्यांचा जवळचा नातेवाईक असल्याने तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगितले जाते.नवी मुंबईची धुरा दिल्यास अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांमधून उघडपणे असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांचे नाव मागे पडल्याचे सांगितले जाते.मीरा बोरवणकर ‘रिलीव्ह’च्या प्रतीक्षेत‘लीगल व टेक्निकल’च्या महासंचालक मीरा बोरवणकर-चढ्ढा यांची केंद्रात बीपीआरअ‍ॅण्ड डी प्रमुखपदी प्रतिनियुक्ती झाली आहे. डीजीचे आणखी एक पद रिक्त होणार आहे. आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक व्ही.डी.मिश्रा यांची बढती होईल. मात्र अन्य नेमणूका न झाल्याने राज्य सरकारने बोरवणकर यांना अद्याप ‘रिलिव्ह’ केलेले नाही. एसीबी, एसआयडी आयुक्तपदाची नियुक्ती का प्रलंबित आहे हे सांगू शकत नाही. मात्र त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.-के. पी. बक्षी, अप्पर मुख्य सचिव, गृह