बारी घाटात बस दरीत कोसळली, सुदैवाने जीविहानी टळली, तीन प्रवाशी किरकोळ जखमी
By Admin | Updated: July 21, 2016 15:27 IST2016-07-21T15:27:43+5:302016-07-21T15:27:43+5:30
अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली

बारी घाटात बस दरीत कोसळली, सुदैवाने जीविहानी टळली, तीन प्रवाशी किरकोळ जखमी
ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. २१ : अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली.दरम्यान या बसचे पुढील बंपर तुटल्याने हि बस सुमारे दीड हजाराहून अधिक खोल दरीत कोसळल्यापासून वाचली.यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.
अकोले आगाराची अकोले हुन कसार्या ला जाण्यासाठी एम.एच.१४ ,बी,टी.११५८ हि बस कासर्या कडे सकाळी साडे आठ वाजता आगारातून निघाली होती.बसचालक मिश्चद्र घोडके व वाहक वर्पे हे चाळीस प्रवासी घेऊन सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बारी घाटातून येत असताना रस्त्यावरील एका खड्ड्यात बस आदळली.यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन बसचे ब्रेक निकामी झाले.अशा स्थितीत बस उजव्या बाजूला खोल दरीत गेली.
दरम्यान बस ने रस्ता सोडल्यामुळे बस खाचरात आदळत गेल्याने पुढील काही साहित्य तुटून ते जमिनीत रोवल्यामुळे हि बस खोल दरीच्या अवघ्या काही फुटाच्या अंतरावर थांबविब्यात चालकाला यश आले.यामुळे सुदैवाने बस मधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.यात चालकासह चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून जखमी प्रवाशांना उपचारार्थ अकोले येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह उपनिरीक्षक कमलेश बच्छाव हवालदार नितीन भालेराव ,चारोस्कर आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ रु ग्णालयात हलविले.
मोठा अनर्थ टळला
दरम्यान या बसमधील चाळीस प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून हि बस सुमारे पंधराशे फूट खोलीच्या दरीच्या अवघ्या दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर थांबली.हि बस पुढे गेली असती तर माळशेज घाटात मागील वर्षी जाणार्या अपघाताची पुर्नरावृत्ती झाली असती.व अनेकांचा बळी गेला असता.केवळ चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
संरक्षण भीती नसल्याने बारी घाट बनला अपघाताचे केंद्र
नगर आण नाशिक जिल्ह्याला जोडणार्या या बारी घाटात गेली काही वर्षापासून अनेक अपघात झाले आहेत.या घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकही दिशादर्शक फलक नसल्याने,तसेच संरक्षण भिंती अथवा जाळ्या नसल्याने अपघात वाढत आहेत.या घाटात जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.