स्पेशल म्हणून खव्याचीच बर्फी

By Admin | Updated: September 22, 2016 03:29 IST2016-09-22T03:29:10+5:302016-09-22T03:29:10+5:30

महागड्या दरात मावा किंवा खव्याची विक्र ी केली जात असल्याची बाब ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गणेशोत्सवात केलेल्या कारवाई समोर आली

Barfi as special as khachchichi | स्पेशल म्हणून खव्याचीच बर्फी

स्पेशल म्हणून खव्याचीच बर्फी

पंकज रोडेकर,

ठाणे- कायद्याच्या पळवाटा शोधून ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात बेधडक पणे स्पेशल बर्फीच्या नावाखाली ४०० ते ५०० रुपये दराने महागड्या दरात मावा किंवा खव्याची विक्र ी केली जात असल्याची बाब ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गणेशोत्सवात केलेल्या कारवाई समोर आली आहे. त्यामुळे ठाणे आणि रायगडकर नागरिकांनो यापुढे सावधान. ही स्पेशल बफर् ी अहमदाबाद येथून १०, २० किंवा ३० रूपये किलो दराने अशी पोत्यातून कोकणात येत आहे.ती मिळेल त्या जागेत ठेवून विक्रेते त्यामार्फत अधिक नफा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या जीवाश्ी खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यंदा गणेशोत्सवात आणि त्यापूर्वीच ठाणे एफडीएने विशेष मोहीम हाती घेतली होती. याचदरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तसेच रायगड येथे टाकलेल्या तीन छाप्यात एकूण ८ लाखांचा मावा- खवा जप्त केला होता. त्यामधील कल्याण आणि अंबरनाथ येथे हा खवा अस्वच्छता असलेल्या ठिकाणी साठवून ठेवल्याचे समोर आले.
मात्र, तो आता नष्ट करण्यात आला आहे. ही मोहिम राबविताना, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीच्या प्रत्येक ठिकाणीहून मावा-खव्यांचे नमुने घेतलेले आहेत.
यंदा कोकणात स्पेशल बर्फीच्या नावाखाली जो काही प्रकार सुरु झालेला आहे. त्याला वेळीच निर्बंध घालण्यासाठी एफडीएने जणू दंड थोपटले आहेत.
कोकणात अशाप्रकारे बर्फी येत असण्याचे उघड झाल्यावर त्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करुन ठाणे एफडीएने तपासणी मोहीम तीव्र करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नमुने घेणे सुरू केले असून ही तपासणी मोहिम आगामी दिवाळीच्या कालावधीपर्यंत राबविण्यात येणार आहे. ही पद्धत वेळीच बंद करण्याचा पुरेपुर प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
>आदेशानुसार
कारवाई जोरात
गणेशोत्सवात कोकण विषबाधेची एकही घटना नाही. गणेशोत्सवात कोकणातील एकाही जिल्ह्यात विषबाधाची घटना घडली नसल्याचा दावा एफडीए ने केला. वरिष्ठांचे आदेशाचे पालन करून मिठाईच्या प्रत्येक दुकानात जाऊन पाहणी केली. तसेच करवाई करण्यास मागे पुढे पाहिले नसल्याचे एफडीएकडून सांगण्यात येत आहे.
>नागरिकांना चांगला आणि दर्जेदार मावा- खवा मिळावा. म्हणून स्पेशल बर्फीची बाब पुढे आल्यावर तत्काळ संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. - सुरेश देशमुख -सह आयुक्त एफडीए (कोकण विभाग)

Web Title: Barfi as special as khachchichi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.